Nashik: मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल पंप बंद असल्यानं नाशिककरांची गैरसोय होत आहे. शहरभर फिरून ही इंधन मिळत नसल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.  विना हेल्मेट पेट्रोल दिल्यास पपंचालकावर आत्महत्याचा गुन्हा दाखल करण्याचे विधान पोलीस आयुक्तांनी केले होते. पोलिस आयुक्तांच्या निषेधार्थ नाशिक येथील पेट्रोलपंप चालकानं बंद पुकारला आहे. परंतु, पोलीस आणि पंप चालकांच्या नियमांच्या लढाईत सर्वसामान्य नाशिककर भरडला जातोय.


नाशिकशहरात आज पासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आलीय. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आलीय. मात्र, विना हेल्मेट वाहनचालकांना पेट्रोल दिल्यास पपंचालकवर आत्महत्याचा गुन्हा दाखल करण्याचे विधान पोलीस आयुक्तांनी केल्यानं त्याविरोधात बंद पुकारण्यात आलाय. अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील चार पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले. महत्वाचं म्हणजे, पोलीस आणि पंप चालकांच्या नियमांच्या लढाईत सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.


जानेवारीपासून 70 लाखांहून अधिक दंड वसूल 
पोलिस आयुक्तांच्या आदेशानूसार शहरात 15 ऑगस्ट 2021 पासून चार टप्प्यात हेल्मेटसक्ती मोहीम राबवण्यात येते आहे. सुरुवातीला नो हेल्मेट नो पेट्रोल त्यानंतर हेल्मेट नसेल तर समुपदेशन, तिसऱ्या टप्प्यात नो हेल्मेट नो को ऑपरेशन आणि त्यानंतर थेट दंडात्मक कारवाईला जानेवारी महिन्यापासून सुरुवात करण्यात आलीय. 20 जानेवारी ते 29 मार्चपर्यंत 14 हजार 134 नागरिकांकडून 70 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय. तसं बघितलं तर एकीकडे शहरात गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलय. गंभीर गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना अपयश येतय. तर, दुसरीकडे पोलिस मात्र हेल्मेटसक्ती मोहीम राबवण्यातच व्यस्त असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातय.


इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या
एकीकडं इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत असताना आता नाशिककऱ्यांना मात्र आज पेट्रोल खरेदी करण्यासाठी शहरभर फिरावं लागत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. तसेच दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचली आहे. 31 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलीटर 80 पैशांनी महागले होते. त्यानंतर आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी इंधन दर स्थिर होते.


येथे तपासा पेट्रोल-डिझेलच्या किंमती
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आरसीपी आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha