एक्स्प्लोर

रहस्यमय दगडफेक, अख्खं गाव दहशतीत!

नाशिक जिल्ह्यातल्या लहवित या गावात मागच्या 15 दिवसांपासून अधून-मधून दगडफेक होत आहे.

नाशिक: सावरखेड एक गाव हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल.  हे गाव ज्याप्रकारे दहशतीत असतं, त्याचप्रकारे नाशिक जिल्ह्यातील एक गाव सध्या दहशतीत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लहवित या गावात मागच्या 15 दिवसांपासून अधून-मधून दगडफेक होत आहे. धक्कादायक म्हणजे ही दगडफेक कोण करतं, का करतं...याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. एखाद्या घरावर किंवा ज्याठिकाणी गावकरी बसलेले आहेत, अशा ठिकाणी एका बाजूनं अचानक दगडं येतात. दगडं कुठून आली, याचा शोध घ्यायला तिथपर्यंत पोहोचण्याची धडपड केली, तर तेवढ्यात दगडफेक बंदही होते. आतापर्यंत अनेकांच्या घरांचं यात नुकसान झालं आहे तर अनेक जण जखमीही झाले आहेत. काहींनी तर हा देवाचा कोप असल्याचाही समज करुन घेतला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा प्रकार खोडसाळपणातून होत असल्याचा दावा केला आहे. गावात भीतीत लहवित हे गाव नाशिक शहरापासून 25 किलोमीटर आहे. या दगडफेकीमुळे या गावात सर्वत्र नीरव शांतता, रस्ते सुनसान आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. एकटे-दुकटे रस्त्याने फिरणारे क्वचित दिसतात. गावात कुणीही अनोळखी आले तरी भेदरलेल्या नजरा संशयानेच रोखल्या जातात. एकटं दुकटं राहण्याऐवजी सगळे गटागटानेच एकत्र येतात. चर्चा होते ती फक्त दगडफेकीची. या गावात धुलीवंदनापासून म्हणजेच गेल्या 15 दिवसांपासून तुफान दगडफेक होतेय. कधी सकाळी, कधी संध्याकाळी तर कधी रात्रीच्या अंधारात दगड येतात. या दगडफेकीत एक दोन नागरिक जखमी झाले आहेत. घरांचे नुकसान झालं, पत्रे फुटले आणि मनात भरलेली भीती तर विचारुच नका. हे सर्व घडत असताना दगडफेक कोण करतो हे कोणालाच कळत नाही.  काहींना हा खोडसाळपणा वाटतोय तर काहींना देवाचा कोप. देवाचा कोप दूर करण्यासाठी गावात नुकतीच मोठी पूजा करण्यात आली, भंडारा बनविण्यात आला. अंधश्रध्देचं मोठं पीक आलं. मात्र दगडफेक काही थांबली नाही. पोलिसांनीही या घटनेत लक्ष घातलं असून, गावातीलच काही टारगट दगडफेक करत असल्याचा संशय त्यांना आहे. गावात पोलिसांची अधूनमधून गस्त होते, पण अद्याप पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. तर हा निव्वळ खोडसाळपणा असून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार असल्याचा दावा अंनिसने केला आहे. गावात होणाऱ्या दगडफेकीमागे कोणाचा हात आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र त्याआधी कोणाला गंभीर इजा झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत असून, पोलिसांनी सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Embed widget