नाशिक: नाशिकमध्ये भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. 122 पैकी 67 जागा जिंकत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नाशिकमधून राज ठाकरेंच्या मनसेचा सुपडा साफ झाला आहे. 39 जागा मिळवून गेल्या वेळी सत्तेत असलेल्या मनसेला यावेळी केवळ एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच म्हणजेच अवघ्या पाच जागा मिळाल्या आहेत.

नाशिकमध्ये 67 जागा जिंकून भाजप नंबर वन ठरला आहे, तर शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत. मनसे घसरगुंडी होऊन पाचव्या स्थानावर गेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी करणाऱ्या जनतेने मतपेटीत मत त्यांच्या बाजुने टाकलेलं नाही. त्यांच्या व्हिजन आणि प्रेझेंटेशनला नाशिककरांचा कौल मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग आहे. एकूण 31 प्रभागात 122 सदस्य निवडून आले आहेत. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार)

  • भाजप 67,

  • शिवसेना 34,

  • काँग्रेस 6,

  • राष्ट्रवादी 6,

  • मनसे 5,

  • इतर 5


महत्त्वाच्या घडामोडी :

  • नाशिकचे महापौर, मनसेच्या अशोक मुर्तडक यांचा विजय

  • नाशिक महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल, 50 जागांवर विजय निश्चित, बहुमताच्या आकड्यापासून 12 जागा दूर

  • राज ठाकरेंचे निकटवर्तीय, नाशिक मनसेचे गटनेते, विद्यमान नगरसेवक अनिल मटाले यांचा दारुण पराभव, प्रभाग 25 मध्ये शिवसेनेच्या श्यामकुमार साबळेंकडून पराभव

  • शिवसेनेचे माजी मंत्री बबन घोलप यांच्या मुलीचा पराभव, भाजपच्या कोमल मेहेरोलियाकडून तनुजा घोलप पराभूत

  • प्रभाग 4 मध्ये भाजपने चारही जागा जिंकल्या

  • नाशिक - मनसेचे माजी महापौर यतिन वाघ यांना पराभवाचा धक्का

  • नाशिकमध्ये भाजपची मुसंडी, 18 जागांवर आघाडी,शिवसेना 5, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 मनसे 1 जागी आघाडीवर

  • भाजप एका जागेवर आघाडीवर

  • नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार आघाडीवर


नाशिक महानगरपालिका विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक 1 (सर्व भाजप) 

रंजना भानसी

अरूण पवार

गणेश गीते

पूनम धनगर

प्रभाग क्रमांक 2 ( सर्व भाजप)

उद्धव निमसे

शीतल मालोदे

सुरेश खेताडे

पूनम सोनावणे

प्रभाग क्रमांक 3

मच्छिंद्र सानप (भाजप)

प्रियंका माने (भाजप)

ऋची कुंभारकर (भाजप)

पूनम मोगरे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 4 (सर्व भाजप) 

हेमंत शेट्टी

शांताबाई हिरे

सरिता सोनवणे

जगदीश पाटील

प्रभाग क्रमांक 5

कमलेश बोडके (भाजप)

नंदिनी बोडके (मनसे)

विमल पाटिल (अपक्ष)

गुरमीत बग्गा (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 6

भिकूबाई बागुल

अशोक मुर्तडक (मनसे),

सुनीता पिंगळे,

पुंडलीक खोडे

प्रभाग क्रमांक

हिमगौरी अडके (भाजप)

योगेश हिरे (भाजप)

स्वाती भामरे (भाजप)

अजय बोरस्ते (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 8  (सर्व शिवसेना)

नयना गांगुर्डे

राधा बेंडकुळे

संतोष गायकवाड

विलास शिंदे

प्रभाग क्रमांक 9 (सर्व भाजप)

गोविंद धिवरे,

हेमलता कांडेकर,

वर्षा भालेराव,

दिनकर पाटील

प्रभाग क्रमांक 10 ( सर्व भाजप)

माधुरी बोलकर

पल्लवी पाटील

शशिकांत जाधव

सुदाम नागरे

प्रभाग क्रमांक 11

दिक्षा लोंढे - रिपाई

योगेश शेवरे - मनसे

सलीम शेख - मनसे

सीमा निगळ - शिवसेना

प्रभाग क्रमांक 12

प्रियंका घाटे- भाजप

समीर काबळे- काँग्रेस

हेमलता पाटील- काँग्रेस

शिवाजी गांगुर्ड- भाजप

प्रभाग क्रमांक 13

गजानन शेलार (राष्ट्रवादी)

वत्सला खैरे (काँग्रेस)

शाहू खैरे (काँग्रेस)

सुरेखा भोसले (मनसे)

प्रभाग क्रमांक 14

शोभा साबळे (राष्ट्रवादी)

समिना मेमन (राष्ट्रवादी)

मुशिर सय्यद (अपक्ष)

सुफी जिम (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 15 (सर्व भाजप) (त्रिसदस्यीय)

प्रथमेश गिते

सुमन भालेराव

अर्चना थोरात

प्रभाग क्रमांक 16

सुषमा पगारे (राष्ट्रवादी)

आशा तडवी (काँग्रेस)

अनिल ताजनपुरे (भाजप)

राहुल दिवे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 17 

दिनकर आढाव (भाजप)

अनिता सातभाई (भाजप)

प्रशांत दिवे (शिवसेना)

मंगला आढाव (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 18

शरद मोरे, भाजप

रंजना बोराडे शिवसेना

मीरा हंडगे भाजप

विशाल संगमनेरे भाजप

प्रभाग क्रमांक 19 (त्रिसदस्यीय)

पंडित आवारे (भाजप)

जयश्री खर्जूल (शिवसेना)

संतोष साळवे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 20 (सर्व भाजप) 

अंबादास पगारे

सीमा ताजणे

संगीता गायकवाड

संभाजी मोरूस्कर

प्रभाग क्रमांक 21

कोमल मेहोरिलिया (भाजप)

रमेश धोंगडे (शिवसेना)

शाम खोले (शिवसेना)

सूर्यकांत लवटे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 22

सरोज आहिरे- भाजप

सत्यभामा गाडेकर- शिवसेना

सुनीता कोठुळे- शिवसेना

केशव पोरजे- शिवसेना

प्रभाग क्रमांक 23 (सर्व भाजप)

रुपाली निकुळे

शाहीन मिर्झा

सतीश कुलकर्णी

चंद्रकांत खोडे

प्रभाग क्रमांक 24

कल्पना पांडे (शिवसेना)

राजेंद्र महाले (राष्ट्रवादी)

कल्पना चुंबळे (शिवसेना)

प्रवीण तिदमे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 25 

सुधाकर बडगुजर (शिवसेना)

हर्षा बडगुजर (शिवसेना)

भाग्यश्री ढोमसे (भाजप)

श्यामकुमार साबळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 26

दिलीप दत्तू दातीर- शिवसेना

हर्षदा संदीप गायकर-शिवसेना

अलका कैलास अहिरे-भाजप

भागवत पाराजीआरोटे-शिवसेना

प्रभाग क्रमांक 27 

राकेश दोदे (भाजप)

किरण गामने (भाजप)

कावेरी घुगे (शिवसेना)

चंद्रकांत खाडे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 28

डी. जी. सूर्यवंशी

सुवर्णा मटाले

दीपक दातीर

प्रतिभा पवार

प्रभाग क्रमांक 29

सुमन सोनवणे-शिवसेना

रत्नमाला राणे-शिवसेना

मुकेश शहाणे-भाजप

अमोल महाले-राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 30 (सर्व भाजप) 

सतीश सोनवणे

सुप्रिया खोडे

दीपाली कुलकर्णी

शाम बड़ोदे

प्रभाग क्रमांक 31

भगवान दोंदे, भाजप

पुष्पा आव्हाड, भाजप

संगीता जाधव, शिवसेना

सुदाम डेमसे, शिवसेना

2012 चं पक्षीय बलाबल

मनसे – 39
शिवसेना-रिपाइं – 22
काँग्रेस – 16
भाजपा – 14
राष्ट्रवादी – 20
माकप – 3
अपक्ष – 6
जनराज्य – 2