एक्स्प्लोर

नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम

नाशिक : उरीमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप ठोक यांना सोमवारी अखेरचा सलाम देण्यात आला. नाशिकच्या खडांगळी या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. यावेळी 'भारत माता की जय', 'शहीद संदीप ठोक अमर रहे' अशा घोषणा देत गावकऱ्यांनी संदीप यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणाही देण्यात आल्या. शहीद संदीप यांच्या मृत्यूनं अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे. खडांगळी गावात ठोक यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिक लोटले होते. नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम

वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात

  ज्या घरातून लग्नाची वरात निघणार होती, त्या घरातून आता अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे शिपाई संदीप सोमनाथ ठोक यांच्या कुटुंबीयांना लाडक्या मुलाच्या मृत्यूमुळे शोक अनावर झाला. मुलाच्या आठवणी सांगताना कुटुंबीयांना भावना अनावर होतात. शहीद संदीप ठोक हे नाशिकच्या खडांगळी गावचे रहिवाशी. घरात सर्वात लहान असलेला संदीप सर्वांचा लाडका होता. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आलेल्या वीरमरणामुळे अवघा परिवार शोकसागरात बुडाला आहे. संदीपचे वडील सोमनाथ कांदा उत्पादक शेतकरी आहेत. संदीपच्या शेतात सडलेल्या कांद्याचा सडा पडलेला दिसतो. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ योगेश आणि दोन विवाहित बहिणी आहेत.   अकराव्या प्रयत्नात यश : दहा वेळा लष्कराच्या भरती प्रक्रियेत अयशस्वी होऊनही संदीपने जिद्द सोडली नाही. चिकाटीने सराव करत अकराव्या प्रयत्नात तो लष्करात दाखल झाला. जुलै 2014 मध्ये संदीप लष्करात भरती झाला. बिहार रेजिमेंट 6 मध्ये तो कार्यरत होता. शत्रूशी लढताना शहीद झालेला संदीप हा सिन्नरच्या भूमीवरचा पाचवा जवान आहे. अभिमानाची बाब म्हणजे दीड हजार लोकसंख्या असलेल्या खडांगळी गावातील 10 युवक लष्करात आहेत. तीन शहीदपुत्रांवर आज अंत्यसंस्कार : उरीमध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील इतर तीन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील. साताऱ्याच्या माण तालुक्यातील जाशी गावचे चंद्रकांत गलांडे, अमरावतीच्या नांदगावचे विकास उईके आणि यवतमाळच्या वणीचे विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील. बारामुल्लाच्या उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर दहशतवाद्यांनी बेसावध असणाऱ्या जवानांवर गोळीबार आणि हँण्डग्रेनेडनं हल्ला केला. ज्यात एकूण 18 जवान शहीद झाले. महाराष्ट्राच्या चार जवानांनी आपलं बलिदान दिलं. राज्य सरकारनं पीडित कुटुबांना प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव काल रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झालं. त्यानंतर शासकीय रुग्णालयातून सकाळी जाशी या त्यांच्या मूळगावी ते रवाना होईल.

संबंधित बातम्या :

दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या मोहिमेला पहिलं यश!

''जर कुणी एक दात पाडला, तर त्याचा पूर्ण जबडाच तोडा''

उरी हल्ल्यावर अनुष्काला भावना अनावर

हृदय पिळवटून टाकणारे वीरुचे ट्वीट

उरीच्या सैन्यतळावर पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज

पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी

उरीमधील भ्याड हल्ल्यात भारताने कोणाला गमावलं?

उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद

जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद

उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती

पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Sudhakr Kohale: भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
Accident News: ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून छत्रपती संभाजीनगरला ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
Nagpur News: दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय
दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget