Mahavitaran Scheme : शेतकऱ्यांनी कृषिपंपाचा भरणा करावा, यासाठी सवलत योजना जाहीर करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जातो. याच अनुषंगाने महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर केली आहे. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ होणार असून योजना संपण्यास काही दिवसांचा अवधी आहे.
वीजबिल म्हटलं नेहमीच ग्राहकांकडून अनेक कारणं पुढे केली जातात. या यावर उपाय म्हणून महावितरणकडून थकलेल्या वीजबिलांची वसुली करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. वसुलीसाठी विशेष पथके तैनात करून वसुली केली जाते अनेकदा शेतकऱ्यांना आवाहनही केले जाते. नाशिक महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजना अस्तित्वात आहेत. अनेक शेतकरी शेतीला पाणी भरण्यासाठी मोटरचा वापर करतात, यामुळे वीजबिल मोठी वाढ होते.
अशावेळी अनेकदा शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत होते. याच पार्श्वभूमीवर कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी सवलत योजना राबविली जात आहे. या धोरणाअंतर्गत जे शेतकरी 31 मार्चपर्यंत थकीत वीजबिल भरतील, त्यांना वीजबिलावर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. या आवाहनानंतरही फार मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे आलेले नाहीत. थकबाकीची रक्कम मोठी आहे तर दुसरीकडे सवलत योजनेचा लाभ फार थोड्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Mahavitaran Scheme : काय आहे योजना
कृषीपंप शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या वतीने कृषी धोरण 2020 राबविण्यात येत आहे. मागीलवर्षी ही योजना सुरु झाली होती. तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्ष आहे. दुसऱ्या वर्षाची मुदत येत्या 31 मार्चला संपणार आहे.
Mahavitaran Scheme : थकबाकी भरल्यास अतिरिक्त सूट
कृषीपंप ग्राहकांसाठी असलेली योजना तीन टप्प्यात राबवि जात आहे. प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास त्यांना 50 टक्के अतिरिक्त सूट, दुसऱ्या वर्षी भरल्यास 30 टक्के व तिसऱ्या वर्षी थकबाकी भरल्यास 20 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाचा कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे.
Mahavitaran Scheme : 31 मार्चपर्यंत मुदत
कृषी धोरण-2020 योजनेनुसार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे शेतकरी 31 मार्च थकबाकीची रक्कम भरतील, अशा शेतकऱ्यांना थकबाकीवर 30 टक्के सवलत दिली जात आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारात माफी, तर सुधारित थकबाकीतही 30 टक्के सूट देण्यात आली आहे. या योजनेसाठी अवघे पाच दिवस शिल्लक असतानाही केवळ नंतर बघू, पैसे आले तर भरु असे म्हणत योजनेची मुदत संपुष्टात येत आहे.
Mahavitaran Scheme : सुमारे 3 हजार कोटींची थकबाकी
- नाशिक परिमंडळात मालेगाव आणि नाशिक असे दोन परिमंडळे असून नाशिक परिमंडळातील 1 लाख 63
- हजार 661 ग्राहकांकडे 1 हजार 456 कोटी तर नाशिक मंडळातील 1 लाख 86 हजार 256 ग्राहकांकडे 1 हजार
- 881 कोटींची थकबाकी अशी एकूण 3 हजार कोटींची थकबाकी आहे.