औरंगाबाद : रविवारी नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसाने गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिककरांचे हाल झाले आहे. असे असले तरी या पुरामुळे औरंगाबादकर मात्र सुखावले आहेत. कारण, गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाणी आता औरंगाबाद, जालन्यातील 300 गावांची तहान भागणार आहे.

नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने नगर जिल्ह्यातील कोपरगाव ओलांडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे जवळपास जायकवाडी धरणापर्यंत गोदावरीचं पाणी पोहोचलं आहे. जायकवाडी धरण औरंगाबाद, जालना जिल्ह्यासह जवळपास 300 खेड्याची तहान भागवतं. त्यामुळे गोदावरीला आलेला पूर औरंगाबादकरांना सुखावणारा आहे.

मुंबई, कोकण आणि इतरत्र भागात पावसाने हजेरी लावली आहे. पण मराठवाडा, औरंगाबाद, जालना यांसारख्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस अजूनही पडलेला नाही. या भागात पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पूराच्या पाण्याने औरंगाबादकर आनंदी झाले आहे.

Mumbai Rain Live | मुंबईत चार तासांपासून मुसळधार, अंधेरी, असल्फा, विक्रोळी आणि कलानगरमध्ये पाणीच पाणी | ABP Majha



नाशिकच्या गोदावरीला पूर

रविवारी नाशिकला झोपडपणाऱ्या पावसाची अजूनही जोरदार बॅटिंग सुरू आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुराचं मापक म्हणून ओळखला जाणारा गोदावरीतला दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी पोहोचल आहे. गाडगे महाराज पुलाखालची वाहनं पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यांवरून नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाणी वाहतंय, तर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील वाहन पाण्याखाली गेली आहेत. पावसाच्या तडाख्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वरमधलं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाली आहेत. नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यानच्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.