हिंगोली : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन पैसे का आणत नाही या कारणावरुन शिक्षकाने आपल्या पत्नीला लोखंडी सळईने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं आहे. पत्नीचा मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गंभीर जखमी असलेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सय्यद मुर्तुजा असं त्या शिक्षकाचं नाव आहे. सय्यद हिंगोली शहरातील आजम कॉलनी भागातील स्कॉलर इस्लामिक इंग्लिश शाळेतील शिक्षक तथा संस्थाचालक आहे. सय्यद मुर्तुजा हा पत्नीला प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन पैसे का आणत नाही म्हणून मानसिक शारीरिक त्रास देत होता.
यावेळी तर त्याने हद्द पार करत पत्नी लोखंडी सळीने बेदम मारहाण केली. प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन पैसे जर नाही आणले तर जीवे मारण्याची धमकी देखील या शिक्षक पतीने केली आहे.
दरम्यान, पत्नीच्या तक्रारीवरुन शिक्षक सय्यद मुर्तुजा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
माहेरुन पैसे आणण्यासाठी शिक्षकाची पत्नीला अमानुष मारहाण, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2019 12:12 PM (IST)
दरम्यान, पत्नीच्या तक्रारीवरुन शिक्षक सय्यद मुर्तुजा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -