स्मार्ट बुलेटिन | 8 जुलै 2019 सोमवार | एबीपी माझा



    1. निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरेंचा आज दिल्ली दौरा, राज्याच्या विधानसभा बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा मनसेचा आग्रह

    2. दिल्लीवारीसाठी मिलिंद देवरांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, संजय निरुपमांचा गंभीर आरोप, तर ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही सरचिटणीसपदाचा राजीनामा

    3. सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेतून परतले, काँग्रेस आणि जेडीएस आमदारांसोबत बैठक, मात्र 13 बंडखोर आमदार राजीनाम्यावर ठाम

    4. नाशिक, कोल्हापूर, साताऱ्याला झोडपल्यानंतर पावसाची अल्पशी विश्रांती, गोदावरी, पंचगंगा आणि मुळासह अनेक नद्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती

    5. गुजरातच्या वलसाड, वापी आणि वडोदरामध्ये पावसाचा कहर, मुंबई-अहमदाबाद मार्गावरची वाहतूक विस्कळीत, तर एमपीतही अनेक जिल्हे पाण्याखाली






  1. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, आग्रा महामार्गावरुन बस नाल्यात कोसळली, 29 प्रवाश्यांचा मृत्यू

  2. आज मध्यरात्रीपासून राज्यभरातले 18 लाख रिक्षाचालक संपावर, ओला, उबरवर बंदी घालण्याची मागणी, हकीम समितीच्या शिफारशींसाठी उपसणार बंदचं हत्यार

  3. मूलं होत नाही म्हणून उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुरुषाच्या पोटातून गर्भाशय काढलं, मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये 29 वर्षीय व्यक्तीवर दुर्मिळ शस्त्रक्रिया

  4. पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्री कंगणा रणौत आणि पत्रकारादरम्यान जुंपली, कंगणानं जुन्या गोष्टी उकरुन पत्रकाराचा अवमान केल्याचा दावा

  5. भारताला विश्वचषक जिकताना बघायचं आहे, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचं वक्तव्य