एक्स्प्लोर

सशस्त्र दरोडेखोराला भिडली बेधडक, नाशिकची 'डॅशिंग लेडी' सविता मुर्तडक

नाशकातील अशोकनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात सविता मूर्तडक काम करत होत्या. सविता एकट्याच असल्याची संधी साधत शस्त्राधारी दरोडेखोर आला आणि त्याने आतून दाराची कडी लावत सविता यांना धारदार चाकूचा धाक दाखवला.

नाशिक : सशस्त्र दरोडेखोराला धाडसाने लढा देणाऱ्या नाशिकच्या 'डॅशिंग लेडी'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशोकनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत सविता मूर्तडक यांनी न घाबरता दरोडेखोराचा प्रतिकार केला. सविता यांनी चोराला दिलेला धाडसी लढा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी बारा दिवसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. अशोकनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात सविता मूर्तडक काम करत होत्या. केंद्रात सविता एकट्याच असल्याची संधी साधत एक शस्त्राधारी दरोडेखोर आला आणि त्याने आतून दाराची कडी लावत सविता यांना धारदार चाकूचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी देत कॅश काऊंटरमधील पैसे काढून देण्यास सांगितलं. मात्र याचवेळी घाबरुन न जाता धाडसाने सविता यांनी त्याला नकार देत त्याच्याशी प्रतिकार करायला सुरुवात केली. काऊंटरमधून बळजबरीने पैसे काढत असताना सविता यांनी त्याच्या हाताला चावाही घेतला. यामुळे चिडलेल्या दरोडेखोराने सविता यांना जोरात भिंतीवर आपटत मारहाण केली. सविता यांचा रुद्रावतार बघून शेवटी या केंद्रातील लाखो रुपयांपैकी फक्त 40 हजार रुपये घेत तो फरार झाला. जखमी झालेल्या सविता यांनी घटनेची माहिती तात्काळ आपल्या पतीला दिली. त्यांनी सातपूर पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा एकचं पथक घटनास्थळी दाखल झालं. विशेष म्हणजे या केंद्रातीलच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला हा सर्व प्रकार बघून पोलिसांनी आपली सूत्रं हलवण्यास सुरुवात केली. 17 मे रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपीचा 12 दिवस उलटूनही शोध लागत नव्हता. अखेर बुधवारी रात्री सातपूर परिसरातूनच 28 वर्षीय संग्राम पारखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. विशेष म्हणजे संग्राम हा कोणीही सराईत गुन्हेगार नसून तो सातपूरच्या एका कंपनीत कामगार आहे. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीकडून काही पैसे उधार घेतले होते. मात्र ते परत करु शकत नसल्याने नाईलाजाने आपण हे केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. सविता मूर्तडक यांच्यावर सध्या सर्वच स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत असून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget