एक्स्प्लोर
नाशकात भुजबळ समर्थकांची मोर्चाची तयारी, मेळाव्याला उदंड प्रतिसाद

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी नाशकात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पहिल्याच आवाहनात तब्बल अडीच हजार समर्थकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावल्याचं म्हटलं जातं. शासनाने सुडबुद्धीतून भुजबळांवर कारवाई केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही जाती-धर्मा विरुद्ध नसून केवळ भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा राहणार असल्याचं रविवारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. मोर्चासाठी अडीच हजार वाहनं आणि लाखो रुपयांच्या निधीचं संकलन भुजबळ समर्थकांनी केल्याची माहिती आहे. औरंगाबाद रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉनमध्ये हा मेळावा पार पडला. भुजबळ समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी उद्यापासून राज्यभर बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















