मनमाड : दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे नाशिकमधील लासलगावसह इतर बाजार समित्या 11 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे कांदा आणि धान्याचे लिलाव तब्बल आठवडाभर बंद राहतील. 12 नोव्हेंबरला पुन्हा लिलाव सुरु होणार आहे.


लासलगाव ही मुख्य बाजारसमिती आजपासून तर काही बाजार समित्या सोमवारपासून बंद राहणार आहेत. त्यामुळे आज-उद्याची साप्ताहिक सुट्टी, दिवाळीची पाच दिवस सुट्टी आणि पुढील आठवड्यात शनिवार-रविवार ही साप्ताहिक सुट्टी असे एकूण नऊ दिवस लिलाव बंद राहतील.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होते. मात्र काही दिवसातच कांद्याच्या दरात घसरण होऊन कांदा सरासरी 1000 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार की घसरण होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असेल.