एक्स्प्लोर
Advertisement
नाशकात ग्रीन कॉरिडॉर, ब्रेनडेड व्यक्तीमुळे 13 जणांना जीवदान
नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडोअरचा यशस्वी प्रयोग झाला. नाशिकच्या अश्विन झळके या 40 वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे 13 जणांना जीवदान मिळणार आहे.
अश्विन यांचा मंगळवारी नाशिकरोड परिसरात अपघात झाला. अपघातानंतर ब्रेन डेड झालेल्या अश्विनच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाशिकच्या ओझर विमानतळावरुन सकाळी साडेनऊ वाजता एअर अॅम्ब्युलन्सनं अश्विन यांचं हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्याच्या रुबी रुग्णालयात पोहचवण्यात आलं.
अश्विन यांचे इतर अवयव रुग्णवाहिकेनं पाठवण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातून विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोर आणि त्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सद्वारे हृदय पोहचवण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्विन यांच्या अवयवदानानं 13 गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement