एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भीम अॅप विषयी सांगा, दहा रुपये कमवा, मोदींची नागपुरात घोषणा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप रेफरल योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळणार आहेत. 14 ऑक्टोबर 2017 पर्यंत भीम अॅप रेफरल योजना सुरु राहणार आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या रेफरन्सने व्यापारी किंवा ग्राहकाने भीम अॅप डाऊनलोड केल्यास तुम्हाला दहा रुपये मिळतील. अशाप्रकारे रोज 20 जणांना भीम अॅपचं महत्त्व समजावून डाऊनलोड करायला लावल्यास दिवसअखेर दोनशे रुपयांची प्राप्ती तुम्हाला होईल, असं मोदी म्हणाले. युवकांना डिजीटल पेमेंटकडे आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचं मोदी सांगतात. समर व्हेकेशनमध्ये जॉब करण्याऐवजी अशाप्रकारे महिन्याअखेर हजारो रुपये कमवण्याची संधी असल्याचंही नरेंद्र मोदींनी सांगितलं. भीम अॅप हा अर्थव्यवस्थेतला महारथी असून त्याचे वापरकर्ते भ्रष्टाचारविरोधी शिलेदार असल्याचं मोदी म्हणाले. सुखवस्तू कुटुंबातही मुलांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून कमी रोकड देतात. कमी रोकडीचं महत्त्व कौंटुबिक स्तरापासून मोठमोठ्या व्यवहारापर्यंत असल्याचं मोदी म्हणाले. नोटाछपाईसाठी अब्जावधी रुपये खर्च होतात. अशा शब्दात डिजीटल पेमेंटचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. पाच वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. पुढील पाच वर्षात प्रत्येक तरुणाने देशाचा विकास करण्याचं उद्दिष्ट बाळगावं, म्हणदजे तोपर्यंत प्रत्येक गरीबाकडे स्वतःचं घर असेल, असं मोदी म्हणाले. देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली नाही, पण देशासाठी जगण्याची संधी मिळाली, असं मोदी म्हणाले. त्या काळी फास कमी पडले, पण भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्यांची देशाला कधी कमतरता नाही, असंही बाबासाहेबांचं आयुष्य गरीबांसाठी कायम प्रेरणादायी ठरलं. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर येण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य मिळालं. बाबासाहेबांना जीवनात क्षणोक्षणी विष मिळालं, पण त्यांनी अमृताचा वर्षाव केला, अशा शब्दात मोदींनी महामानवाला मानवंदना दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपSpecial Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget