एक्स्प्लोर

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध?

मुंबई : गोव्यातील बॉम्बस्फोटामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा कट चार वर्ष लांबल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. आरोपी वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना 2009 मध्ये दाभोलकारांची हत्या करायची होती, त्याचप्रमाणे पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारीही दाभोलकरांच्या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे.   गोव्यातील मार्गाव बॉम्ब ब्लास्टच्या कटापूर्वीच दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. मात्र मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांच्याकडून अपघाताने नियोजित ठिकाणाच्या आधीच बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येचा कट पुढे ढकलल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून आरोपी अकोलकर परागंदा आहे.   2009 मध्येच दाभोलकरांची हत्या घडवून आणण्याचा दोघांचा इरादा असल्याचं तपासात पुढे आलं आहे. तावडेला गेल्या आठवड्यात पनवेलमधून अटक झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला तो पहिला आरोपी आहे. हत्येसाठी तावडेची बाईक वापरण्यात आली होती. दाभोलकरांच्या अंधश्रद्धाविरोधी कार्यामुळे तावडेचा त्यांच्यावर राग असल्याचं म्हटलं जातं. त्याच शूटरने पानसरेंची हत्या केल्याचीही माहिती आहे.   पुण्यात कार्यरत पोलिसाचाही हात : पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारीही दाभोलकरांच्या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राच्या बातमीनुसार हा अधिकारी सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. वीरेंद्र तावडे आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यातील कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. विशेष म्हणजे या पोलिस अधिकाऱ्यानेच तावडेला शस्त्र पुरवल्याचं म्हटलं जातं. माजी (तत्कालीन) गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलिस दलातील अधिकाऱ्याचे संबंध असल्याची कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट केलं आहे.

... तर डॉ. नरेंद्र दाभोलकर वाचले असते

20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली होती. मॉर्निंग वॉकला गेले असताना ओमकारेश्वर पुलाजवळ दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली.     डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दोन हल्लेखोरांपैकी सारंग अकोलकर यानेच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावाही सीबीआयनं केला आहे.

संबंधित बातम्या :

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा छडा लागला?

कोण आहेत सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे?

तावडे-आकोलकरला शस्त्रांचा कारखाना सुरु करायचा होता : सीबीआय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget