एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या तपासात सीबीआयला मोठं यश, हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल अरबी समुद्रात सापडलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासात सीबीआयला मोठं यश आहे. हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल अरबी समुद्रातून सापडलं आहे. सीबीआयने नॉर्वेतील जलतरणपटूंची मदत घेतली आहे.

पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एक पिस्तूल शोधून काढलं आहे, हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढलं आहे.

आता हे पिस्तूल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे स्पष्ट होईल. ऑगस्ट 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात पुण्यातील न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये सीबीआयने हे पिस्तूल शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. ठाण्यातील खारेगाव खाडीजवळ आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र फेकलं होतं. तेथून हे पिस्तूल शोधून काढण्यात आले आहे.

सीबीआयने या प्रकरणी सात जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यामध्ये वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, खूप दिवस समुद्राच्या तळाशी शोध घेतल्यानंतर आम्हाला एक पिस्तूल सापडले. आता दाभोलकरांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांची ज्या गोळ्या लागून हत्या करण्यात आली. त्यांचा आकार आणि या पिस्तुलातून डागण्यात येऊ शकणाऱ्या गोळ्यांचा आकार हे दोन्ही तपासून बघितले जाईल. त्यानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे सिद्ध होईल.

संबंधित बातम्या
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले

Embed widget