एक्स्प्लोर

राणेंचा भाजप प्रवेश होल्डवर, ‘ती’ गुप्त भेट उघड झाल्यानं भाजपत गोंधळ

मुंबई: काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भेट घेतल्याची बातमी लीक झाल्यानंतर भाजपमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यासाठी उत्सुक नसलेल्या नेत्यांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. यामुळे किमान सध्यातरी नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होल्डवर गेला आहे. नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट गुप्त होती. पण ही गुप्त भेट सार्वजनिक झाल्यानं  भाजपत गोंधळ सुरु आहे. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होल्डवर ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला नारायण राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता पण गुप्त भेटीची बातमी फुटल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेश अडचणी निर्माण झाल्या आहेत. खासगी कामासाठी अहमदाबादला गेल्याचा दावा करणाऱ्या राणेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात, असा सवाल आता उपस्थित होत आहे. अमित शहाच घेणार राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल अंतिम निर्णय भाजपत राणेंना प्रवेश मिळू नये यासाठी राज्यातील भाजपमध्ये एक दबाव गट तयार झाला आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांचाही विरोध असल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे आता राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीतील तपशील अमित शहांना कळवण्यात येईल. पण राणेंना पक्षात घ्यायचं की नाही, यांचा अंतिम निर्णय अमित शहा हेच घेतील. गुप्त भेट उघड झाल्यानं राणेंच्या अडचणीत वाढ? भाजपकडून पक्ष प्रवेश होल्डवर गेल्यामुळे नारायण राणेंची मात्र बरीच अडचण झाल्याचं बोललं जात आहे. राणेंची अहमदाबादमधील भेट उघड झाल्यानं काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वास वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या संघर्षयात्रेतही ते सहभागी झाले नव्हते. तर दुसरीकडे भाजपमध्ये त्यांच्याविरोधात दबाब गट तयार झाला आहे. त्यामुळे आता नारायण राणे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  ‘ती’ भेट गुप्तच राहिली असती तर? जर ही भेट गुप्त राहिली असती तर नारायण राणे स्वत:च्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करु शकले असते. पण भेटीची बातमी जगजाहीर झाल्यानं त्यांना भाजपच्या अटींवर प्रवेश करावा लागण्याची शक्यता आहे. काय आहे नेमकं प्रकरण? दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसत होतं. ‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसत होते. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळत होते. “मी काल अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही,” असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं. संबंधित बातम्या:

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Kubni Record : कुणबी नोंद कशी शोधायची? A to Z माहिती
Maratha Kubni Record : कुणबी नोंद कशी शोधायची? A to Z माहिती
Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
खेळाडूंच्या नोकर भरतीचे सुधारित आरक्षण धोरण मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचे 7 धडाकेबाज निर्णय
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा, मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार
Uddhav Thackeray on Vishakha Raut : आम्ही लढाई लढूच, एकतर्फी कारवाई आणि बेबंदशाही सुरु, उद्धव ठाकरे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाताच म्हणाले...   
आमचे नगरसेवक दणादण बाद करतात, त्यांच्यावरच्या केसेसचे निकाल लागत का लागत नाहीत?: उद्धव ठाकरे
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
Video: विधानसभेत कामकाज सुरु असतानाच अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका, मंत्र्यांनी तत्काळ CPR दिला, रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
CM, DCM बद्दल मनोज जरांगेंची एकेरी भाषा; भरत गोगावले म्हणाले, सांगा त्याला, प्रताप सरनाईंकाकडूनही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
PM Modi Vadodara Event : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम बुक माय शोवर एका तासात हाऊसफुल्ल, सगळी तिकिटं संपली, 42 हजार वेटिंगवर
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत, संपूर्ण देशाने डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्यातून काय मिळतं? राज ठाकरेनंतर आता संभाजी भिंडेनी सुद्धा डीजे समर्थकांना कडक शब्दात फटकारलं
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Filmmaker R Sarath Dies: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध दिग्दर्शकाची गंभीर आजाराशी झुंज संपली; रुग्णालयातच सोडले प्राण
Embed widget