एक्स्प्लोर

भाजपच्या साथीने नारायण राणे नवा पक्ष काढणार?

नारायण राणे शुक्रवारी भाजप प्रवेशाबाबत घोषणा करतील, अशी अशा व्यक्त होत आहे. पण त्याऐवजी राणे स्वत:चा पक्ष स्थापन करतील, त्यासाठी भाजप त्यांना सहकार्य करेल, अशी शक्यता आहे.

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणेंच्या सोमवारी सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनानंतर सभेत 21 तारखेला पुढील घोषणा करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे शुक्रवारी ते भाजप प्रवेशाबाबत घोषणा करतील, अशी अशा व्यक्त होत आहे. पण त्याऐवजी राणे स्वत:चा पक्ष स्थापन करतील, त्यासाठी भाजप त्यांना सहकार्य करेल, अशी शक्यता आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरुन विविध तर्क लढवले जात आहेत. कारण, त्यासाठी त्यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची घेतलेली भेट. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या काळात राणेंच्या गणपती दर्शनामुळे, त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. पण राणेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमधील एक गट राणेंच्या पक्ष प्रवेशावर फारसा अनुकुल नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे अनेकांचे मत आहे. दुसरीकडे कालच्या सभेत नारायण राणेंनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल भाष्य न करता, नव्या पक्ष उभारणीचे संकेत दिले आहेत. त्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.या निमित्त ते पक्ष उभारणीसाठी चाचपणी करत असल्याचं जाणवतं. या निवडणुकीत राणेंच्या ‘समर्थ’ पॅनेलला घवघवीत यश मिळाले, तर भाजपकडून पुढील पक्ष बांधणीसाठी राणेंना सर्वोतोपरी मदत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील महादेव जानकर, विनायक मेटे यांसारखे नेते आपापल्या पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून आमदार नसतानाही सत्तेचा लाभ घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच नारायण राणे नवीन पक्षाची स्थापना करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget