Narayan Rane On Manoj Jarange News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) सुरु केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे उपोषण मागे घेण्यासंदर्भात अनेकजण विनंती करत आहेत. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले नारायण राणे ?


मनोज जरांगे पाटील यांच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍या झाला आहे. त्यामुळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही, असे नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे. नारायण राणे यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय नारायण राणे यांच्यावर मिम्सही पोस्ट केले आहे. राणेंच्या या ट्वीटवर मराठा समाजातून संताप व्यक्त करण्यात येतोय. 


मनोज जरांगे पाटील यांच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे ते आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्यांना मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात  फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्यांनी केली. त्यांनी आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखवावे. तेव्हा असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे. 






मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तश्राव - 


मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे.  मनोज जरांगे यांना उपचाराची गरज असल्याचेही डॉक्टरांनी सांगितलेय. पण मागण्या मान्य झाल्याशिवाय काहीही नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, अहमदनगरसह राज्यभरात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आलाय.