एक्स्प्लोर

संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे

ठाणे: संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून, आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली. नारायण राणेंनी आज ठाणे रुग्णालयात जाऊन संदीप सावंत यांची भेट घेतली.   निलेश राणे यांनी बेदम माराहाण केल्यामुळेच चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत जबर जखमी झाल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर ठाण्यात उपचार सुरु आहेत.   गैरसमजातून हा प्रकार झाला आहे. मारहाण झाली की नाही, कितपत झाली, याबाबतचे वैद्यकीय अहवाल येणार आहेत. तसंच पोलिस तपासही सुरु आहे. त्यामध्ये सत्य निष्पण्ण होईल, पण संदीप सावंत यांना जी काही मदत लागेल, ती करायला तयार आहे, असं नारायण राणे म्हणाले.   संदीप सावंत यांच्याशी आमचे घरचे संबंध आहेत. त्यांना विधानसभेचं तिकीट निलेश राणेंनीच मिळवून दिलं होतं. त्यामुळे आम्ही आमचं बघून घेऊ, असं राणे म्हणाले.   मारहाणप्रकरणी निलेश राणे यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.   दुसरीकडे निलेश राणे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.  Sandeep sawant, Nilesh Rane काय आहे प्रकरण? मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये रविवारी निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांचं चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं. तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.   स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.   संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा दरम्यान, संदीप सावंत यांनीही  काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले,” असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.   यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.   निलेश राणेंची प्रतिक्रिया दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
दिलासादायक! मान्सून पुढे सरकला! महाराष्ट्रातील नेमका कोणता भाग व्यापला, जाणून घ्या सविस्तर माहिती 
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget