एक्स्प्लोर

2 वा. सोनियांना पत्र, 2.25 वा आमदारकीचा राजीनामा, नारायण राणेंनी काँग्रेस सोडली!

कुडाळमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट व्यक्त केली.

सिंधुदुर्ग : "मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही काँग्रेस ते पाळलं नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो," अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी 12 वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद व्यक्त केली. दोन वाजता सोनिया गांधींना पत्र पाठवलं आणि 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला, असं सांगत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. काँग्रेसने आश्वासन पाळलं नाही "काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही," असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढलं. "आम्ही राणेंना घाबरतो, असं काँग्रेस समोरुन दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही," अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी "तीन वेळा म्हणाले मुख्यमंत्री करतो, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही. 48 आमदारांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा सांगूनही माझं नाव घोषित केलं नाही. प्रणव मुखर्जी, दिग्विजय सिंह विमानातून दिल्लीला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर केलं," असं राणे यांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाणांनी खातंच बदललं "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मला भेटले. तुम्हाला हवं ते मंत्रीपद मागा, असं सांगत, त्यांनी माझं महसूल मंत्रीपद काढून उद्योगमंत्री बनवलं," अशी नाराजी नारायण राणेंनी व्यक्त केली. मला आमदारकी मिळू नये म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत   "मी आमदारकी मागितली नव्हती. राहुल गांधी यांनी मला आमदार केलं. मला आमदार करु नये यासाठी अशोक चव्हाण दिल्लीत बसून होते," असा आरोप नारायण राणेंनी यावेळी केला. "विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला दिलं पाहिजे होतं. मी वरिष्ठ नेता असूनही मला गटनेता केलं नाही," असे नाराज राणे म्हणाले. 2 वा. सोनियांना पत्र, 2.25 वा आमदारकीचा राजीनामा नारायण राणे म्हणाले की, "दोन वाजता सोनिया गांधींना राजीनामा पत्र पाठवलं आणि 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे राजीनामा पाठवला. पत्र पाठवून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे आभार मानले, त्यांच्यावर टीका केली नाही." अनेक पक्षांकडून ऑफर्स, पण दसऱ्याच्या आधी निर्णय "आज पक्ष सोडला आहे. पुढचा निर्णय नवरात्र संपण्याच्या आत घेऊ. माझ्याकडे अनेक पक्षाच्या ऑफर आहेत. योग्य ठिकाणी योग्य वेळी निर्णय घेऊ. कोणाची काय ऑफर आहे ते मी योग्य वेळी तपासेन, राजकारणात येऊन मला 50 वर्ष झाली आहेत. आता महाराष्ट्र दौरा करणार आहे. नागपूर, औरंगाबाद, नांदेडला जाणार आहे," असं नारायण राणेंनी सांगितलं. नितेश राणेंचा योग्य वेळी निर्णय "निलेश राणेंनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ. पण नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेमधीलही अनेक आमदार राजीनामा देतील," असं नारायण राणे म्हणाले. अशोक चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदाची पात्रता नाही नारायण राणेंनी यावेळी अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली. तुमच्याकडे अध्यक्षपद आहे, पण माझ्याकडे नाही. तरीही माझ्या मागे किती लोक आहेत हे मी दाखवून देईन. माझे सगळ्या पक्षात मित्र आहेत, अशोक चव्हाणही मित्र आहेत पण प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पात्र नाहीत, असं राणे म्हणाले. नारायण राणेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - तुम्ही काय आम्हाला बरखास्त करता, आम्ही तुम्हाला सोडून देतो : नारायण राणे - हवं ते मंत्रिपद मागा म्हणून मला पृथ्वीराज चव्हाणांनी महसूल काढून उद्योगमंत्री दिलं : राणे - बारा वर्षातील माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही : नारायण राणे - अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली : नारायण राणे - विधानपरिषदेत गेलो, विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला द्यायला हवं होतं. मी सिनियर असून गटनेता केलं नाही : राणे - आता राहुल गांधींनी आमदार केलं, मी मागितलं नव्हतं, शेवटच्या दिवसापर्यंत अशोक चव्हाण दिल्लीत होते, राणेंना आमदार करु नका म्हणून : राणे - 48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं:राणे - महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो : नारायण - 3 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली : राणे - मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही : राणे - तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं : नारायण राणे - मला मॅडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार : राणे - विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही : राणे - 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो : नारायण राणे - काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे : राणे - आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते : राणे -अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु : नारायण राणे

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dr. Babanrao Taywade: छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप
Nashik News: मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत
मुंबईहून 40 जणांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंड परिसरात स्नान करताना चार मुलं बुडाली, एकाचा दुर्दैवी अंत
Pune Crime News: कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?
कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली अन् 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, दोघांना बेड्या; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
Embed widget