एक्स्प्लोर

एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, तरीही हार न मानणाऱ्या राणेंचा विजय

मुंबई : एक घराणं, दोन वर्ष आणि तीन पराभव, पण तरीही हार न मारता पुन्हा भरारी घेण्याचं ध्येय ठेवलेला नेता म्हणून नारायण राणेंचा उल्लेख करता येईल. कारण नारायण राणे यांनी पुन्हा एकदा त्याच जोषात महाराष्ट्राच्या विधीमंडळात एण्ट्री केली आहे, त्याबाबतची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे.   विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने, आता राणेंच्या नावापुढे 'आमदार' नारायण राणे लागणं एक औपचारिकता राहिली आहे.   लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव   लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राणेंच्या घरी पहिला पराभव आला.  या निवडणुकीत राणेंचे चिरंजीव निलेश राणे यांचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी पराभव केला. या पराभवापासून जणू राणेंना ग्रहणच लागलं.   विधानसभा निवडणुकीत नारायण राणे हरले   लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचा सूपडासाफ झालाच, मात्र मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या नारायण राणेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. कुडाळ मतदारसंघात शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला.   वांद्रे पोटनिवडणुकीतही नारायण राणेंचा पराभव   विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यानंतरच वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. यावेळीही नारायण राणेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकलं. यावेळी शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. 'मातोश्री'च्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं आणि निवडणूक चुरशीची केली. मात्र इथेही राणेंच्या पदरी पराभव आला.   विधानपरिषदेसाठी पुन्हा उमेदवारी   दरम्यान, राणेंच्या तीन पराभवांना जवळपास तीन वर्षे उलटली आहेत. त्यानंतरही राणेंमधील उर्मी शांत राहिली नव्हती. राणेंनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्त्वाचा विश्वास संपादन केला आणि विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली. आता ही निवडणूकच बिनविरोध झाल्याने, राणे पुन्हा त्याच उर्मीने विधानपरिषदेत दाखल होतील.   फर्डे वक्ते, कामाचा अनुभव, प्रशासनावर वचक   विधीमंडळाच्या वरच्या सभागृहात काँग्रेसकडे म्हणावा तितका आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रोखणारा, प्रसंगी त्यांचे निर्णय खोडून काढणारा आणि विधीमंडळाची संपूर्ण जाण असणाऱ्या उमेदवाराची काँग्रेसला गरज होती. तीच गरज ओळखून काँग्रेस नेतृत्त्वाने राणेंच्या पदरात विधानपरिषदेची उमेदवारी दिली.   राणे केवळ फर्डे वक्तेच नाहीत तर, त्यांना प्रशासनाची जाण आहे. विधीमंडळाचे नियम, प्रशासनावर वचक याबाबत त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे राणेंच्या आगमनाने विधानपरिषदेत नवचैतन्य येईल, अशी आशा काँग्रेसला असेल.

संबंधित बातम्या

राणे कुटुंबात वर्षभरात तीन पराभव, पोटनिवडणुकीतील आकड्यांचा खेळ 

भाजप माझ्या रडारवर, नारायण राणेंचा इशारा

शिवसेनेमुळेच मी घडलो: नारायण राणे

"सामना"विरुद्ध नारायण राणेंचा "प्रहार"

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget