मुंबई : पीपल्स आर्ट्स सेंटर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षपूर्तीचा भव्य दिव्य सोहळा वांद्रेच्या रंगशारदा सभागृहात आज पार पडला. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' (Maharashtrache Girishikhare) या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटटगंडी, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर (Rajiv Khandekar), शास्त्रीय गायिका आशाताई खाडिलकर, संगीत दिगदर्शक अशोक पत्की, मराठी गझल गायक भीमराव पांचाळे, हणमंतराव गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शास्त्रीय व लोककलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सवी वर्षाचा सोहळा 1 मे 2020 रोजी नियोजित होता. परंतु कोव्हीड प्रादुभार्वामुळे व शासनाच्या निबंर्धामुळे हा सोहळा आज म्हणजे 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला.
यांना मिळाले पुरस्कार
शरद पवार (राजकारण), डॉ.जयंत नारळीकर (विज्ञान), कु.उषा मंगेशकर (पार्श्व गायिका), सुरेश वाडकर (पार्श्व गायक), डॉ. भालचंद्र नेमाडे (साहित्य), सुनील गावस्कर (क्रिकेट), डॉ. मीरा बोरवणकर (नोकरशाही), श्री.राजीव खांडेकर (इलेक्ट्रॉनिक मध्यम), सौ.तेजस्विनी सावंत (क्रीडा), डॉ. उदय माहोरकर (वैद्यकीय सेवा),अमोल पालेकर (अभिनेता), श्रीमती रोहिणी हट्टंगडी (अभिनेत्री), श्री.भीमराव पांचाळे (मराठी गझल गायक), डॉ.विश्वनाथ कराड (शैषणिक). डॉ.जब्बार पटेल (नाटक व चित्रपट), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शक), कुमार केतकर (पत्रकार), डॉ.दीपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), सिंधुताई सपकाळ (समाजकार्य), अनंत कुलकर्णी (अभियंता), हनमंतराव गायकवाड (आतिथ्य क्षेत्र), उमेश झिरपे (पर्वतारोहण), प्रवीण ठिपसे (बुद्धीबळ), विश्वासराव मांडलिक (योग गुरु), दिनकरराव पाटील (अन्न प्रक्रिया).
महत्वाच्या बातम्या
- Video : कोल्हापूरच्या रणरागिणीने केलं मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य, मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करणारी पहिली महिला कॉन्स्टेबल
- ST Strike : मी खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते : नाना पटोले
- ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात नकार