एक्स्प्लोर

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!

मुंबई: खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणेंप्रकरणी नवा गौप्यस्फोट झाला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय. 'माझा'च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात. पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री! त्यामुळे खासगी कामासाठी राणेंना राज्याचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात असा सवाल आता उपस्थित होत आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. Rane_Fadnavis मात्र राणेंनी मुंबईत पोहोचताच पहिली प्रतिक्रिया दिली. खाजगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का? असा प्रतिसवाल राणे यांनी विचारला. पण आता राणे आणि मुख्यमंत्री काल रात्री अहमदाबादमध्ये एकाच कारमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे त्यांचं खरंच खासगी काम होतं की राणे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहेत, यावरुन अंदाज बांधले जात आहेत. दौरा खासगी - राणे दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईत पोहोचताच, आपला अहमदाबाद दौरा हा खाजगी कामासाठी असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी माझानं दिली होती. पण त्यावेळी राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची शक्यता फेटाळून लावली होती.. पण त्याचवेळी राज्यातल्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली होती... त्यामुळे राणेंचा अहमदाबाद दौरा हा कमालीचा लक्षवेधी ठरला आहे. मुख्यमंत्री - अमित शहांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास – 1968 – वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश – 1968 – शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी – 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले – 1990-95 – नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर – 1991 – छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले – 1990-95 – याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद – 1996-99 – युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान – 1999 – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड – 2005 – शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली – 2005 – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश -2005 – शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी – 2005 – आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड – 2007 – काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड – 2009 – विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण – 2014 – लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा – 2014 – मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा संबंधित बातम्या राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट? नारायण राणे यांचा राजकीय प्रवास नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Navnath Ban on Vivekanand Patil: विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर
विवेकानंद यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा; नवनाथ बन यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं प्रत्युत्तर

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget