एक्स्प्लोर

नंदुरबार अवैध धंद्यांचा ‘हॉटस्पॉट’; बायोडिझेल, गुटखा, दारू आणि रेशन तस्करांचं यंत्रणांना खुलं आव्हान

नंदुरबारमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची बायोडिझेल, गुटखा, दारू आणि रेशन तस्करी होते.

नंदुरबार : नंदुरबार हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वसलेला जिल्हा आहे. शेजारील गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने शेजारील मध्यप्रदेश मधून नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी महाराष्ट्रात होत असते. आता याजोडीला बायोडिझेल माफियांनीही जिल्ह्यात डोकंवर काढले असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने साठ दिवसात 60 हजार लिटर बायोडिझेल जप्त केले आहे.

बायोडिझेल नावाने घातक रासायनिक पदार्थांची विक्रीचे मोठे रॉकेट

नंदुरबार जिल्ह्यातून दोन महामार्ग जातात. सध्या या महामार्गांवर बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा प्रशासनाने 60 दिवसात 60 हजार लिटर बायोडिझेल जप्त केले आहे. कारवाया होत असल्या तरी बायोडिझेलची विक्री सुरू आहे. बायोडिझेल संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने पोलीस आणि महसूल विभागाने कारवाई कशी करावी असाही प्रश्न यंत्रणांना समोर आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुठलाही रसायन निर्मितीचा कारखाना नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात हा रासायनिक पदार्थ जिल्ह्यात कसा उपलब्ध होत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र कारवाई करून याच्या मुळाशी पोलीस यंत्रणा किंवा महसूल विभाग जात नाही. कारण बायोडिझेल विक्री संदर्भात अनेक चर्चा रंगत असून याला राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. यातून मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची चर्चाही आता रंगू लागल्या आहेत. बायोडिझेलच्या नावाने विक्री होणारे हे बायोडिझेल नसून ते घातक केमिकल आहे. हे केमिकल आता महामार्गावरील हॉटेलवर सर्रास उपलब्ध होत असल्याने या विक्रीच्या वादातून कायदा-सुव्यवस्था ही धोक्यात येऊ शकत असल्याने प्रशासनाने आता तरी सतर्क होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू आणि गुटखा तस्करी

 गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने मध्यप्रदेशमधून नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन तपासणी नाके पार करून दररोज दारू तस्करी होते. जिल्ह्यातील अनेक पोलrस स्टेशनच्या हद्दीतून ही वाहने मार्गक्रमण करीत असतात. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा यांना कधीही ही तस्करी दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेव्हा एखाद्या माध्यमांनी यावर आवाज उठवल्यावर लहान मोठी कारवाई करून मोकळे होतात. मात्र यातून होणाऱ्या तस्करीला आशीर्वाद कुणाचे आहेत ते सांगणे गरजेचे नाही ते सर्वश्रुत आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याने शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुटखा तस्करी केली जाते. इथूनच संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा पुरवला जात असतो. गुटखा तस्करांनी महाराष्ट्र गुजरात सीमेवरती गुजरात राज्याच्या हद्दीत मोठी गोदामं घेतली, असून तिथून गुटका तस्करीचे अध्याय सुरु आहेत. गुटखा तस्करीचे उघड गुपित यंत्रणांसहित सर्वांना माहीत असताना अन्न औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणा काय करीत आहेत, असाही सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी आणि जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी बायोडिझेल आणि इतर तस्करांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. असं असलं तरी आता यावर कारवाई होणार की त्यांच्याशी हितसंबंध असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी याला केराची टोपली दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget