एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिक्षक-विद्यार्थिनीची बदनामी केल्याचा जाब विचारत दोघांना मारहाण
शिक्षक आणि विद्यार्थिनीची बदनामी का केली, असा जाब विचारत नऊ जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.
नांदेड : शिक्षक आणि विद्यार्थिनीची बदनामी का केली, असा जाब विचारत एका टोळक्याने दोघा तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण तरुणीच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती आहे.
नांदेडमधील औसा तालुक्यातील किल्लारी भागातील एका लॉजवर ही घटना घडली.
किल्लारीमध्ये राहणारे खाजगी क्लासचे शिक्षक राहुल कदम यांनी गावातील एका तरुणीला चित्रपट पाहण्यासाठी नेलं, त्या दोघांचे संबंध आहेत, अशी खोटी माहिती संबंधित तरुणांनी पसरवल्याचा आरोप टोळक्याने केला आहे.
शिक्षक आणि विद्यार्थिनीची बदनामी का केली असा जाब विचारत, नऊ जणांनी तौफिक आणि अप्पू बिराजदार या तरुणांना गाडीवर बसवून एका लॉजवर नेलं. त्यानंतर दोघांनाही जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर आपल्या वडिलांना बोलावून त्यांच्यासमोरही आपल्याला मारहाण करण्यात आली, अशी फिर्याद तौफिकने दिली आहे.
किल्लारी पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर बाकीचे आरोपी अद्याप फरार आहेत. मारहाण झालेल्या दोन्ही तरुणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement