एक्स्प्लोर
Advertisement
तवेरा ओढ्यात पडून वाहून गेली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
तवेरा कार ओढ्यात पडून नांदेडमध्ये झालेल्या अपघातात दिवटे दाम्पत्यासह पाच वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले.
नांदेड : नांदेडमध्ये तवेरा कार ओढ्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला. अपघातात दिवटे दाम्पत्यासह पाच वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले.
नांदेडमधील नायगाव तालुक्यातील मांजरम गावात ही घटना घडली. दिवटे कुटुंबातील तिघे जण तवेरा गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी गाडी ओढ्यात पडून वाहून गेली.
सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, मात्र हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीच गाडी आणि त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
45 वर्षीय बाबूशा दिवटे, 40 वर्षीय पारुबाई दिवटे आणि पाच वर्षांच्या अनुसया दिवटे यांचा अपघातात मृत्यू झाला. तिघेही मयत नायगाव तालुक्यातील बरबडा गावचे रहिवाशी होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement