एक्स्प्लोर

नांदेडच्या माहूरमध्ये 1900 एकर जमिनीचा वाद, राजघराण्यातील 11 जणांचा जमिनीवर दावा

राजाचा एकही वारसदार मागील अनेक वर्षांपासून माहूर शहरात वास्तव्यास नाही. पण मागील काही वर्षांपासून अचानक हे 11 वारसदार समोर आले. त्यांनी तब्बल 1900 एकर जमिनीवर दावा केला.

नांदेड : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ ही ओळख असलेल्या नांदेडमधील माहूर सध्या एका राजाच्या जमिनीवरुन चर्चेत आहे. या जमिनीत मोठा घोळ झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल 1900 एकर जमिनाचा हा घोळ आहे. राजाच्या वारसदारांनी आमची 1900 एकर जमीन परत मिळावी, अशी मागणी केली आहे. जमीन परत नाही मिळाली तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आमरण उपोषण करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

माहूर तालुक्यातील दहा गावांमध्ये राजे जसवंतसिंह यांची जहागिरी होती. 1900 एकर एवढी जमीन तालुक्यातील दहा गावांत विखुरली आहे. पण आज या जमिनीवर अन्य लोकांनी ताबा घेतला आहे. कुणाकडे खरेदीखत आहे, तर कुणाकडे सातबारा आहे. आता ही जमीन यांच्याकडे आली कशी हा संशोधनाचा विषय आहे.

प्रतिभा चौहान, कमलराज चौहान, माधवी चौहान, श्रीमती दुर्गा चौहान, युवराज चौहान, ताराबाई चौहान, वीणा चौहान, सुदेश चौहान, निकेश चौहान, क्रांती चौहान, लिना चौहान यांनी आम्ही राजांचे वारसदार असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने या वारसांचा दावा मान्य केला आहे, मात्र हे जमिनीचे वारस आहेत का? याची पडताळणी मात्र होणार आहेत.

राजाचा एकही वारसदार मागील अनेक वर्षांपासून माहूर शहरात वास्तव्यास नव्हता. मात्र मागील काही वर्षांपासून अचानक हे 11 वारसदार समोर आले. त्यांनी तब्बल 1900 एकर जमिनीवर दावा केला. यातील काही दाव्यात जमीन सरकारी असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. मात्र अजूनही वारसदार म्हणतात की सर्व जमीन त्यांच्या मालकीची आहे.

आमच्या आजोबांनी जमिनी सरकारकडे निगराणीसाठी दिली होती. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनी भ्रष्ट मार्गाने दुसऱ्यांच्या नावावर केल्या आणि हे प्रकरण घडलं, असा आरोप चौहान कुटुंबियांनी केला. तसेच माहूर येथे गेल्यावर आमच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget