Nanded Crime Updates: नांदेडच्या (Nanded News) हिमायतनगरमधील वाशीच्या जंगलात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड असं मृत व्यक्तिचं नाव आहे.


हिमायतनगर शहरातील (Himayat Nagar News) पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड या युवकाचा तेलंगणा बॉर्डरवरील वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान मारेकऱ्यांनी निघृणपणे दगडाने ठेचून चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत असलेला आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अशा 4 आरोपींविरुद्ध कलम 302,34 भादंवि अनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 


हिमायतनगर शहरातील युवक पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड  (रा.लाकडोबा चौक) याचा मृतदेह हिमायतनगर - तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. मयत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना आरोपींनी त्याला बोलावून वाशीच्या जंगल भागात नेऊन इतर साथीदाराच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला. दरम्यान सदर खून अपघात असल्याचे भासविण्यासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.


पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात


याबाबत बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम 302, 34 भादवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


परिसरातील नागरिकांकडूनही ही घटना नरबळीच असल्याचा संशय व्यक्त


तसेच मयत युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदरील व्हिडीओ कुणी काढला, कसा व्हायरल झाला हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दरम्यान त्या मृतदेहाच्या शेजारी लिंब, तांब्या आणि फुले दिसत असल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर  घटनास्थळावर गेलेल्या परिसरातील नागरिकांकडूनही ही घटना नरबळीच असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nanded: महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असतानाच मागून आलेल्या वानराने दिला धक्का आणि...


Nanded Sanitary: महापालिकेने वसवलेल्या तेहरानगरात राहणाऱ्या दृष्टिहीन नागरिकांच्या वसाहतीत घाणीचे साम्राज्य