नांदेड: बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मंगळवारी संजय बियांनी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला. दरम्यान, या घटनेनंतर व्यापारी, व्यावसायिक, बिल्डर यांच्यात प्रशासनाच्या विरोधात प्रचंड रोष पहावयास मिळतोय.
संजय बियाणी यांच्या अत्यंसंस्कार प्रसंगी जमलेल्या व्यावसायिक, गावकरी आणि कुटुंबियांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर या प्रकारे नांदेड शहरातील व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, धमकी आणि प्राणघातक हल्ले होऊनही पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल कुटुंबियांनी केला. संजय बियाणी यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारों लोकांचा सहभाग होता. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत लोकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या, ग्रामीण भागातील शेतकरी गावकरी यांना नेहमीच मदत करणाऱ्या, गरजू लोकांना मदत करणाऱ्या आणि गरीब गरजूंना 76 हक्काची मोफत घरे देणाऱ्या अशा व्यक्तीची दिवसाढवळ्या क्रूरपणे हत्या झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर हत्येच्या या घटनेस 24 तास उलटूनही हल्लेखोर अद्याप पोलिसांना हाती न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नांदेड शहरात दिवसाढवळ्या बांधकाम व्यासायिकाची गोळ्या झाडून झालेली हत्या म्हणजे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होणारी घटना असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी आपण पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितलय. तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nanded Crime News: नांदेडमध्ये बिल्डर संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, खंडणी वसुलीसाठी हत्या करण्यात आल्याची चर्चा
- धक्कादायक! चहामध्ये फिनेल, गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचं औषध; पत्नीकडून पतीवर विषप्रयोग, पतीच्या खुनाच्या प्रयत्नात महिलेला अटक
- पुण्यात किडनी तस्करी, 15 लाखांचं आमिष दाखवून काढली किडनी, नंतर पैसे देण्यास नकार