मुंबई :  पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काही क्षणांत शरद पवार माध्यामांशी आज दिल्लीत संवाद  साधला. पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी राज्यातील प्रलंबीत आमदारांच्या नियुक्ती, संजय राऊतांवर झालेली कारवाई या विषयी चर्चा केली. जाणून घ्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.


12 आमदारांच्या प्रश्नांवर पंतप्रधान विचार करून निर्णय घेणार 


शरद पवार म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल नियमाला धरुन काम करत नाहीत. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचाही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला आहे. ही गोष्ट आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली. त्यावर पंतप्रधानांनी या मुद्द्यावर लक्ष देण्याचं आश्वासन दिलं.


संजय राऊतांवर कारवाईची गरज नव्हती


मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत.  त्यांच्यावर कारवाईची गरज नव्हती, असे देखील शरद पवार पंतप्रधान मोदींना म्हणाले. 


महाविकास आघाडी सरकार पुन्हा येणार : शरद पवार


ईडीने संजय राऊत आणि इतर नेत्यांवर कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला धोका आहे का असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार आहे.  महाविकास आघाडी सरकारला सध्या कोणताही धोका नाही


नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल कोणतीही चर्चा नाही


महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही.  फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे. नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.


राष्ट्रवादी आणि शिवसोना भाजपविरोधात उभी आहे 


आमची कटुता शिवसेनेशी, राष्ट्रवादीशी नाही या मुनगंटीवाराच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी  उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसोना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधी भाजप सोबत नव्हती. दुसऱ्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. 


लक्षद्वीपच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदींशी चर्चा


लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांनी पदभार हाती घेतल्यापासून एकाधिकारशाहीप्रमाणे काम करायला सुरु केलं असून ते लोकांना विश्वासात घेत नाहीत, लक्षद्वीपच्या या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण खासदार मोहम्मद फैजल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.