एक्स्प्लोर

Nanded | RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेणाऱ्या खाजगी लॅबवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई 

नांदेडमध्ये (Nanded) कोरोना चाचणीसाठी ( RTPCR) अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या लॅबोरेटरीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकासह छापा मारला आणि लॅबोरेटरीला सील ठोकले. 

नांदेड : शहरातील थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबकडून कोरोनाच्या RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जादा दराने पैसे घेऊन पिळवणूक होत असल्याची माहिती नांदेड जिल्हा प्रशासनास मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लॅबोरेटरीवर छापा टाकला आणि लॅबोरेटरीला सील ठोकले. 

थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबकडून कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णांकडून अतिरिक्त रुपये घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती.  त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर हे शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर लेन येथील थायरोकेअर पॅथॉलॉजी लॅबवर महापालिकेच्या डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्या वैद्यकीय पथकासह पोहचले. तपासणी दरम्यान समोर आलेल्या अभिलेखानुसार सरकारने आरटीपीसीआर या कोविड तपासणीचा दर 600 रुपये निश्चित केला असतांना थायरोकेअर लॅब मात्र रुग्णांनकडून 2000 रुपये दराने रुग्णांची तपासणी करून लूट करत असल्याचे निदर्शनास आले.

त्यावर महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिह बिसेन यांच्या तक्रारीवरून थायरोकेअर लॅब ने 8 रुग्णांकडून कोविड आरटीपीसीआर चाचणी साठी 16 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. एकूणच सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीची रक्कम थायरोकेअर ने घेतली आहे. त्यानुसार आरोपी शशिकांत चंद्रकात शेळके व आनंद राजाभाऊ बोकन यांच्यावर वाजीराबाद पोलिसांनी गुन्हा क्रमांक 116/2021भारतीय दंड संहितेच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 (ब )आणि साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राज्यात शनिवारी पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Embed widget