नांदेड : महाविकास आघाडी  सरकार आणि पीक विमा कंपनीने संगनमत करून स्वतःचं उखळ पांढरं केलं असा आरोप करत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा का मिळत नाही असा सवाल माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. शिवसेनेचं आणि विम्या कंपनीचं साटेलोटे आहे का? असाही सवाल  त्यांनी केला आहे.


महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरते आहे, असा आरोप भाजपा नेते तथा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केलाय. 2020 या वर्षात शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती झालेल्या असताना शेतकऱ्यांना विम्याचा फायदा अद्याप झालेला नाही असंही ते म्हणाले. 


विद्यमान सरकारच्या काळात एक कोटी 38 लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढलाय, त्यातल्या फक्त 15 लाख लोकांना केवळ 974 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. उर्वरित 4234 कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात गेले असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे पीक विमा कंपनी आणि सरकार यांनी संगनमताने स्वतःचे उखळ पांढरं केलंय असंही ते म्हणाले. 


इतकी मोठी रक्कम विमा कंपनीला मिळत आहे. याचा अर्थ 100 कोटींचा एक सचिन वाझे गृहीत धरला तर उर्वरित 40 वाझे कोण आहेत याचा शोध घ्यावा लागेल असं सांगत माजी मंत्री अनिल बोंडे यांनी शिवसेना आणि विमा कंपनी यांच्यात काहीतरी साटेलोटे आहे असाही  घणघणाती आरोप केला आहे .


महत्वाच्या बातम्या :