Bhandara News भंडारा : अहमदनगर येथे शनिवारी झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या राजीनाम्या संदर्भात भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला. भुजबळांच्या या व्यक्तव्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी देखील भुजबळांच्या या वक्तव्यावर टीका करत सरकारवर घणाघात केला आहे. एकीकडे स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं, आणि दुसरीकडे स्वतःच सांगायचं की मी राजीनामा दिलाय. ही जी काही नौटंकी चाललेली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.


एकानं एक बोलायचं आणि दुसऱ्यानं दुसरं बोलायचं आणि लोकांच्या प्रश्नाकड दुर्लक्ष करायचं असे काम सरकारमध्ये सुरू आहे. मंत्रीमंडळामध्ये देखील अशीच नौटंकी चाललेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं हे महाभ्रष्ट सरकार असून त्याचेचे रोज दर्शन आपल्याला होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.


देशात पूर्णपणे संभ्रमाची परिस्थिती


भुजबळांच्या राजीनाम्याचं उत्तर हे मुख्यमंत्रीचं देऊ शकतात. त्यामुळे कोणी राजीनामा दिला की नाही दिला, याच्यावर जाण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय करणार, तरुणांसाठी काय करत आहेत, हे बोलणं गरजेचे आहे. इथे रोज तरुणांना फसवलं जात आहे. गरिबाला रोज महागाईच्या झोकात टाकलं जात आहे. या सगळ्या प्रकारची उत्तरे सरकारने द्यावी आणि या पद्धतीची नौटंकी सरकारनं बंद करावी, असे नाना पटोले म्हणाले. आज देशात नेमकं काय चाललं आहे आणि देशातील फासिस्ट सरकार काय करतेय? हे काय कळायला कुणालाच काही कारण नाही. मिडीयाला दबावात आणून ठेवलेलं आहे. वास्तविकता लोकांसमोर येवू दिली जात नाही. आज जी काही परिस्थिती आहे, ती पूर्णपणे संभ्रमाची परिस्थिती आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.


गेल्या 75 वर्षात देशात पहिल्यांदा असे घडले 


एकीकडे अपमान करायचा आणि एकीकडे भारतरत्न द्यायचे. देशाचे सरकार हे देशातील जनतेसाठी आहे की, मूठभर लोकांसाठी आहे. सरकार संविधानाच्या आधारावर आहे की, सरकारने त्यांचे वेगळं असे संविधान बनविलेलं आहे. कारण गेल्या 75 वर्षात देशात पहिल्यांदा असे घडत आहे. त्यामुळे सरकार भारतरत्न कोणालाही देवू शकतात. अगदी जे पाकिस्तानचे पुरस्कृत आहे त्यानांही देवू शकतात, अशा शब्दात नाना पटोले यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित केल्याप्रकरणी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या