सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी दिली, पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जनसंपर्क दौऱ्यावर असून त्यांची राणेंच्या बालेकिल्ल्यातही तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जून निवडणूक बाकी आहे पण मी तुम्हाला भेटायला आलो आहे. निवडणुकीला देखील येईन आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईन. उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सत्यविजय भिसे आणि श्रीधर नाईक खून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील, तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती, असा  टोलाही त्यांनी पीएम मोदी यांना लगावला. 



ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर यांचा डबल गद्दार असा उल्लेख केला. ते म्हणाले की, मी एका अपेक्षेनं घेतलं होते. मात्र, गद्दार ते गद्दार, कधीही इमानदार होऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, शिवसेना कोणाची हे तुम्हाला विचारायला आलो आहे. डबल गद्दार त्याचं नाव घेण्याची गरज नाही. आपल्याकडे आले होते तेव्हा अपेक्षेने घेतलं होत. आठवड्याला साईबाबांकडे जातात तेव्हा वाटलं होत माणूस बरा दिसतो. श्रद्धा आणि सबुरी असेल, पण त्याची कोणाची श्रद्धा नाही सबुरी तर नाहीच नाही. जी काही वळवळ एका मतदारसंघात राहिली आहे त्याचा सुपडासाफ करून टाका, असे आवाहन त्यांनी केले. 


आमदार गणपत गायकवाड मुद्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. कोणीही मागितले नसताना गणपत गायकवाडने केलेल्या गोळीबाराचे फुटेज बाहेर आलं. मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलो नाही, तर त्याने बोललं काय ते पाहा.  माझे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे आहेत असं गणपत गायकवाड म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मोदी यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, 2014 मध्ये चाय पे चर्चा केली आता आपण होऊन जाऊ दे चर्चा करूया. नुसता घोषणांचा पाऊस पडत आहे, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. पंतप्रधानांच्या योजनांचा फायदा सर्वात जास्त गुजरातला. मी हुकूमशहा आणि खोटारड्यांचा विरोधक असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या