Gondia News गोंदिया : राज्यामध्ये सध्या सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद  सरकारनिर्मित तसेच स्क्रिप्टेड आहे. काँग्रेसला (Congress) याबद्दल काहीही बोलायचं नाही. सरकारच्या वतीने हा वाद मुद्दाम घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं जात आहे. काँग्रेसला या वादात पडायचं नाही. राज्यात आणि देशात आज महागाई, बेरोजगारी सारखे ज्वलंत प्रश्न असतांना त्याकडे कोणाचे लक्ष नाही. मुळे मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचे काम काँग्रेस(Congress) करणार असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे. 


जनाची नाही तर मनाची लाज बाळगा


मंत्री छगन भुजबळ सारख्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेचा अपमान करणारे आहे. नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर, त्याच्या आम्ही निषेध करतो. सरकारने देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे. या सरकारनं 'जनाची नाही तर मनाची लाज बाळगली' पाहिजे, अशा शब्दात नाना पटोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलल्या व्यक्तव्यावर भाष्य करत सरकारवर घनाघात केला.


काकाच्या जीवावर जे मोठे झाले ते काकाला शिव्या मारत असतील तर..  


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत, शेवटची निवडणूक आहे असे सांगून भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत...? असे म्हणत बारामतीत अजित पवारांनी भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला दिला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, मोठ्यांचा अपमान करणं, मागासवर्गीयांचा अपमान करणे म्हणजे या जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम सरकार करत असून सत्तेच्या नशेमध्ये असे वक्तव्य हे लोक करतात.


तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल का बोलत नाही. असा सवाल ही यावेळी नाना पटोले यांनी अजित पवारांना केला. तर नाना पटोले पुढे म्हणाले की, काकाच्या जीवावर जे मोठे झाले, ते आज काकाला शिव्या मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही. पण यांचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करत आहेत. याला सरकारने गांभीर्याने घ्यावे. हे कोणाच्या बापाचे सरकार नाही. असेही नाना पटोले म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या