Nana Patole : मणिपूर येथून निघालेली न्याय यात्रा आज मुंबईत आली आहे. भाजपच्या (BJP) राज्यात कशी वागणूक या यात्रेला मिळाली हे आपण बघितले आहे. अनेक राज्यात ताफ्यावर जी दगडफेक झाली त्याचे आम्ही निषेध करत आहोत. मंदिरात जाऊ दिले नाही. तुम्हाला पूजा करायचा अधिकार नाही. आम्ही धर्माचे ठेकेदार आहोत असे दाखवले गेले. महाभारतात धृतराष्ट्राची भूमिका हे सरकार बजावत आहे. सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत नाही. महाराष्ट्रातूनच नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सत्तेचे पतन होणार हे नक्की आहे, अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर (Modi Governmant) केली आहे. 


आज काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) ठाणे येथे धडाडली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमच्या इलेक्टोरल बॉण्डचा हिशोब घ्या. त्यांना हजारो कोटी रुपये कसे मिळाले? राजस्थानमध्ये झालेल्या गोष्टीची निंदा राहुल गांधी यांनी केली. आमचे सरकार असेल आणि काही चूक झाली तर आम्ही मुख्यमंत्री बदलतो. असं भाजप करत नाही.


खरी गॅरंटी ही काँग्रेसने दिली


स्त्री शक्ती पुन्हा ताकदीने उभी राहावी, यासाठी आम्ही पाच गॅरंटी दिल्या आहेत. गॅरंटी हा शब्द आणि मोदी हे जोडशब्द वापरतात तो खरा जुमलेबाजी आहे. खरी गॅरंटी ही काँग्रेसने दिली आहे. इलेक्टोरल बॉण्डमध्ये न खाऊंगा न खाने दूंगा हे बोलणारे मोदी कुठे गेले?? स्टेट बँक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नव्हते. सुप्रीम कोर्टाने फटकारले. त्यांचं लपलेला पाप उघडकीस आलं. 


फडणवीस-दरेकरांवर नाना पटोलेंची टीका


व्हॅक्सिनेशन कंपनीकडून खंडणी घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे काळाबाजार करणाऱ्या एका व्यापाऱ्याला रात्री कुबेर काळात सोडवायला गेले. मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. हे इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 


देशात सत्तेचे परिवर्तन होणार


राहुल गांधीच लोकांचे नेतृत्व करू शकतात, असा विश्वास मणिपूर ते मुंबई सहा हजार किलोमीटर चालून आल्यावर निर्माण झाला आहे. लोकांना, गरिबांना, कामगारांना, शेतकऱ्यांना अशा सगळ्यांना न्याय द्यायला ही यात्रा काढून गॅरंटी दिली. देशात सत्तेचे परिवर्तन होणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार येणार हा लोकांच्या विश्वास आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha 2024 : नाशकात गोडसेंविरुद्ध सक्षम उमेदवार देण्यासाठी मविआचा मास्टर प्लॅन, 'या' बड्या नेत्याला लोकसभेचं तिकीट?