Nagpur News नागपूर : नागपूरचा विकास आज देशात गाजतोय. सिमेंट रस्त्याची जाणीव मी 2019 ला करून दिली होती. त्यामुळे केळीबाग असेल किंवा इतर विकासकामे आहेत ते बघता सरकारनी स्वतःचा कसा विकास केला हे बघितलं पाहिजेल. उपराजधानी नागपूर (Nagpur News) सारख्या शहरात पावसाळ्यात नाव चालते, अजून किती विकास पाहिजे? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरींवर (Nitin Gadkari) जोरदार निशाणा साधलाय. ते नागपूर येथे बोलत होते. 


दरवर्षी नागपूर येथे होणारे नुकसान आपण पाहिले आहे. विकासाच्या नावातून झालेला भ्रष्टाचार आज शहरांमध्येही पाहायला मिळतो आहे. आज ग्रीन बेल्ट उध्वस्त करताय, त्याचेच परिणाम डेंगू, चिकन गुनिया सारख्या आजरांनी डोके वर काढले असून नागपूरकरांना या आजारांना पुढे जावे लागते आहे. आधी विकासाची कामे व्हायची, आता स्वत:च्या विकासाची कामे होत आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. 


केवळ आपल्या बगल बच्चांना मोठं करायचे सरकारचे काम 


नागपुरात येत्या 22 तारखेला मोठा मोर्चा आम्ही करतोय. सेबीचा घोटाळा हिंडन बर्गच्या माध्यमतुम समोर आला आहे. बँकेत आम्ही पैसे टाकतो तर टाकायला आणि काढायला पैसे लागतात. मध्यमवर्गीय आज शेअर्समध्ये पैसे लावतात. मात्र, या पैशावरही डाका कसा टाकता येईल हे आता होताना दिसत आहे. शनिवारवाड्या सारखी ऐतिहासिक वास्तूचे खासगीकरण करण्याचा घाट सरकारचा आहे. एकुणात देशचं लिलावात लागला आहे. त्यांनी लाल किल्ला पण देऊन ठेवला आहे. केवळ आपल्या बगल बच्चांना मोठे करायचे काम हे सरकार करत असल्याचा घणाघातही  नाना पटोले यांनी केलाय.


महाराष्ट्र वाचवणे हेच काँग्रेसचे ध्येय!


महाराष्ट्र गुजरातला विकायला काढलेला असताना आपला महाराष्ट्र वाचविणे, हाच एक काँग्रेससमोरचा एक मुख्य प्रश्न आहे.  राज्यातील  सरकारने राज्य गुजरातला विकायला काढला आहे, त्यांच्या तावडीतून महाराष्ट्र वाचविण्याचे प्रयत्न काँग्रेसचा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र उभा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहे. त्याबत आता कुठलीही प्रतिक्रिया काँग्रेस देणार नसल्याचेही नाना पटोले म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या