Maharashtra Politics : महाराष्ट्रातलं सरकार हल्ली गुजरातच्या नेत्यांची हुजरेगिरी करत आहे. असचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे‌. स्वत: राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री झाल्या झाल्याच त्या पद्धतीनं सांगितलं की, आमचे आका नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि  अमित शहा (Amit Shah) आहेत. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला एक प्रकारचं ठेच पोहोचवणारी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली होती. महाराष्ट्र हा कधी दिल्लीला झुकला नाही आणि झुकणार ही नाही. पण आज परिस्थिती राज्यातल्या सरकारची तीच असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीय. मराठी माणसाने हुजरेपणाची भूमिका सोडायला हवी या शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. 


राज्यात आद्याप फोडाफोडीचे अन् खोक्याचं राजकारण- नाना पटोले 


भारतीय जनता पार्टीचं जे अधिवेशन पुण्याला झालं त्याच्यात स्वतःच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, आम्ही 20 आमदार फोडले. कशा कशा पद्धतीनं सरकार फोडलं, त्याच्याबद्दलचं वर्णन त्यांनी त्यांच्या भाषणात केलेलं आहे. आता फोडाफोडीचं राजकारण आणि खोक्याचं राजकारण महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे असतील, भाजप असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी सुरू केलेलं आहे आणि तसं वक्तव्य ते करतातचं आहे. त्यामुळे आम्हाला आरोप करायची गरज नाही. वास्तविकता ज्या लोकांनी फोडाफोडीचं राजकारण या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे, त्यांच्याच वक्तव्यातून ते बोलत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी शिंदेंनी तीन ते चार हजार कोटी रुपये खर्चून शिवसेनेतील नेते विकत घेतले या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केलंय.


शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर, तेच आज सत्तेत- नाना पटोले  


अमित शहा तडीपार आहेत, असं शरद पवार म्हणतात. खरंतर प्रफुल्ल पटेल यांनाच गृहमंत्री केलं पाहिजे. त्यांच्याजवळ सिस्टीम जी आहे, वेळेवर सत्तेमध्ये घुसायचं हा त्यांना जास्त अनुभव आहे. त्यामुळे आता प्रफुल पटेल काही पण बोलतील. शिखर बँकेत घोटाळा झाला. ज्या सरकारमध्ये हे आहेत ज्या सरकारला हे समर्थन करत आहेत. त्यांचेच प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितलं की, 72 हजार कोटींचा भ्रष्टाचार बँक यांनी लुटलेले लोक आहेत. आणि आठ दिवसानंतर त्याच अजित पवार यांना आपल्या पक्षांमध्ये घेतलं. त्यामुळे आता प्रधानमंत्री यांनी त्याचा शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी त्याला आपली वेगळी भूमिका मांडायचं कारण नाही. अजित पवार यांच्यावर शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप लागलेला आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी घोटाळ्याचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत घोटाळा असा उल्लेख करू नये असं वक्तव्य केलं आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांचा खरपूस समाचार घेतला.


इतर महत्वाच्या बातम्या