Yavatmal Crime News : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची (Crime News) घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर मारवाडी असे  हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे पत्नीचे नाव आहे. तर सुरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. गेल्या काही काळापासून या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते. दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृतक प्रभाकर हा अडसड ठरत होता. दरम्यान प्रेमात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीची हत्या करून हा अडसर दुर करावा, असा या दोघांचा बेत होता. 


दरम्यान, जयश्री आणि सूरजने एक दिवस आखलेल्या योजनेनुसार प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर हत्येचा पुरावा मिटवण्याच्या अनुषंगाने  गावाशेजारील एका फाट्यावर पती प्रभाकर यांचा मृतदेह फेकून दिला. मात्र कालांतराने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता संशयाची सुई पत्नी आणि तिच्या प्रियकराकडे वळली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी  केली असता दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पूढील कायदेशीर कारवाई सध्या पोलीस करत आहेत. मात्र या हत्येच्या घटनेने सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


चारित्र्यावर संशय घेवून पतीनं पत्नीचा तलावरीनं कान कापला


चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीवर तलवारीनं प्राणघातक हल्ला करीत तिचा कान कापला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील नवरगाव इथं घडली. गंभीर जखमी पत्नी ही मुलीसोबत झोपली असताना संशयी वृत्तीच्या पतीनं तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्यावर आणि कानावर गंभीर जखमा झाल्यात. सध्या जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुनिता गुर्वे (45) असं गंभीर जखमी पत्नीचं नावं आहे. तर, तुमसर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक केलेल्या आरोपी पतीचं नावं सुनील गुर्वे (50) असं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या