एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नामदेव शास्त्रींची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल
अहमदनगरः भगवान गड दसरा मेळावा जवळ येईल तसे अनेक नवनवीन प्रकार समोर येत आहेत. गडाचे मंहत नामदेव शास्त्री यांच्या भाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी गर्दी जमल्यास लोकांना कसं परतून लावायचं याबद्दलचं मार्गदर्शन शास्त्री या क्लीपमध्ये करत आहेत.
शास्त्रींच्या भाषणाच्या ऑडिओ क्लीपमधील मजकूर
''आपले लोक एवढे आहेत.. याचा अंदाज नाही आपल्याला. जे पत्रकार परिषदा घेतात, जे लोक गडाच्या विरोधात बोलतात.. जर कुणी फेसबुकवर आपल्याविरोधात बोललं तर पोरांनी आपल्यासारखं टाका. बीड, परळीचे लोक दादागिरी करण्याचा प्रयत्न करतील. सहजासहजी सगळ्यांनी ऐकलं तर ठीक. नाही ऐकलं तर माझा निर्णय असा आहे. दसऱ्याच्या दिवशी सगळ्या मुलांनी आपला ड्रेसकोड घालायचा. राणेगाव असेल, गोरेगाव असेल, पारधा असेल.. एका लायनिनं उभं रहायचं. त्यादिवशी ट्रॅफिक अडवायचं नाही. येऊ द्या ना गाड्या वरती, होऊ द्या ट्रॅफिक जाम.. आणि गडावर आलेला कुठलाही माणूस.. चला बाहेर, काय काम आहे, ते सांग..
आपण काय कुण्या धरण्याचे सेवक नाहीत. आणि एवढ्या बांगड्या भरलेल्या नाहीत आपण. आणि त्यांनी काय ठरवायचं.. आपण जाहीर करणारे, भगवान गडावर कुणी यायचं नाही.
अर्धी लोकं तिथंच गायब होतील, रायलेत फक्त चमचे, चला बाहेर.. मग कशाला थांबतील?, जसजशी परिस्थिती बदलेल, तसतसे तुम्हाला अपडेट येत राहतील, आणि आपलं हे शेवटचं पाऊल आहे.''
पाहा संपूर्ण ऑडिओ क्लीप जशीच्या तशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
राजकारण
क्राईम
Advertisement