एक्स्प्लोर
एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री

अहमदनगरः ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. पंकजा मुंडे समर्थकांना या क्लिपमध्ये महंत नामदेव शास्त्रींनी सूचक शब्दात इशारा दिला असल्याचं दिसतंय. एका स्थानिक पत्रकाराशी झालेलं हे संभाषण असल्याचं नामदेव शास्त्रींनी 'माझा'शी बोलताना सांगितलं. ऑडिओ क्लीपमधील संभाषण ''मी नामदेव शास्त्री आहे. माझ्या मागे पण लोकं आहेत. मी सत्येबरोबर लढतोय. मी माणसं थांबवलेत. तुम्हाला तुमचं नगर कळत असलं तरी मी एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझी.. आमचे लोकं इतके खवळलेत ना... माझं ऐका, तुम्ही या भानगडीत पडूच नका, तुम्ही भाग घेऊ नका, काहीच करु नका.. मला रमेश घुले काय करतो, का कोण अजून कोण काय करतं ना, हे सगळं माझ्या लक्षात आहे. मी तर तयारीमध्येच आहे. माणसं थांबवलेत उलट मी.. यांच्या लक्षात येत असेल की तो परिसर कसा आहे, काही त्रास घेऊ नका मी मजबूत आहे. तुम्ही ज्या कुळात जन्माला आलात ना.. तो घुले असेल, तुम्ही असाल, मी असेल.. कारण एवढा चांगला गड केलाय ना.. कारण की आपल्या आई-बापाचा उद्धार, भगवान बाबांचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे, आपली खानदानच ती आहे.. मला काही घेणं देणं नाही, मी कशाला संपवू... बस तेवढं समजून घ्या..''
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















