एक्स्प्लोर

चंद्र-सूर्य असेपर्यंत भगवानगडावर भाषण नाही : नामदेवशास्त्री

मुंबई/बीड: भगवानगडाचं व्यक्तीमत्त्व हे राजकीय नाही तर संतांचं आहे. त्यामुळे भाषण करण्याचा बालहट्ट सोडावा, असा सल्ला महंत नामदेवाशास्त्री यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. भगवानगड हा ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या ठरावाप्रमाणे, इथून पुढे चंद्र-सूर्य असेपर्यंत गडावर राजकीय व्यक्ती कोणीही बोलणार नाही, असं नामदेवशास्त्रींनी स्पष्ट शब्दात सांगितलं. भगवानगड, दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे यांच्याबाबतची स्पष्ट भूमिका नामदेवाशास्त्री यांनी मांडली. पंकजा मुंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने नामदेव शास्त्री यांच्यांशी संपर्क साधून, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. पंकजाने हर्ट केलं पंकजा मुंडे मुलीसारखी आहे. ती स्वत: भगवानगडाची मुलगी असल्याचं सांगते. मात्र ऑडिओ क्लिप ऐकल्यापासून मला दु:ख झालं. पंकजांची क्लिप ऐकल्यानंतर हर्ट झालो, आता त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही, असं नामदेव शास्त्री म्हणाले. ..तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा भगवानगडावर ट्रस्टने इथे भाषण करण्यास परवानगी दिलेली नाही. आम्ही याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे ट्रस्टच्या विरोधात जाऊन जो कोणी सभा घेईल, त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नामदेव शास्त्रींनी केली. राजकारणाला मीडियाने महत्त्व देऊ नये भगवानगडाचं व्यक्तीमत्त्व हे राजकीय नाही तर संतांचं आहे. राजकारणाला मीडियाने महत्त्व देऊ नये.  ही गादी संतांची आहे. अपवाद म्हणून गोपीनाथ मुंडे इथे बोलत होते. म्हणून धार्मिक ठिकाणी तो वारसा चालवावा, असा आग्रह मीडियाने धरु नये. गोपीनाथराव हे भगवानबाबांपेक्षा लहान आहेत. ते त्यांचे शिष्य आहेत, असं नामदेव शास्त्री म्हणाले. या गडावर राजकारण नको, अशी भगवानगड ट्रस्टची भूमिका आहे. कन्या मानलं म्हणून भगवानगडाचा वाटा मागू नका गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांना भगवानगडाची कन्या मानलं. त्यांना भावनिक आधार दिला. मात्र आमच्या भावनेचा आदर न करता, कन्या मानलं म्हणून तुम्ही लगेच भगवानगडाचा वाटा मागता का, असा सवाल नामदेव शास्त्रींनी केला. मीडियामुळे पंकजा हर्ट राजकारण्यांची परंपरा गडाच्या डोक्यावर नको. या गोष्टीचा मीडियाने इश्शू केला. मीडियामुळे मी पंकजाविरोधात काहीतरी राजकारण करतोय असा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतोयस असं नामदेवशास्त्री म्हणाले. ना धनंजय, ना पंकजा माझ्याप्रकरणामध्ये ना धनंजय मुंडे आहे, ना पंकजा मुंडे आहे. भगवानगडाचं अस्तित्व मानत असाल, भगवानबाबांना मानत असाल, तर दिलेला आदेश पाळा, असं आवाहनही नामदेवशास्त्रींनी केलं.    गोपीनाथ गड उभा राहिल्याचा आनंद गोपीनाथ गड उभा राहिल्याचा आनंद झाला हे मी त्या-त्या वेळी जाहीर बोलत आलेलो आहे. गोपीनाथ गड उभा केल्याचा आनंद, पंकजाने वडिलांचं अस्तित्व जिवंत ठेवलं, असं नामदेवशास्त्री म्हणाले. गोपीनाथ मुंडेंची तुलना नको गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर भगवान गडावर कोणत्याही भाषणाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीनाथ मुंडे हे वेगळं व्यक्तीमत्त्व होतं. ते भगवानबाबचे शिष्य होते. त्यांची कोणाशीही तुलना नको, असंही नामदेवशास्त्रींनी नमूद केलं. गडावर कोण यायचं हे भक्त ठरवतील भगवानगडावर दसऱ्याला कोण यायचं, कोण नाही, हे भक्त ठरवतील, असं म्हणत नामदेवशास्त्रींनी पंकजा मुंडेंच्या भाषणाला विरोध केला.  गवानगडाच्या पावित्र्यासाठी इथं कोणतंही भाषण नको असं ते म्हणाले. संबंधित बातम्या पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी

पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे

पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री पंकजा मुंडे राजीनामा द्या : धनंजय मुंडे भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा  भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget