मुंबई : विधानसभेत नंबर एकचा पक्ष राहिल्यानंतर सत्ता राखण्यात भाजपला यश आलं नाही. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला आणि भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचा पण धरला. त्याचीच प्रचिती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येत आहे. देवेंद्र फडणवीसांचं होमपिच असलेल्या नागपुरातच भाजपला मोठा धक्का बसला आहे.


नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र जिल्हा परिषदेच्या 58 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 58 पैकी काँग्रेस 30, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 15, शेकाप 1, अपक्ष 1 तर शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधानं मानावं लागणार आहे.

एकूण जागा : 58

काँग्रेस - 30
राष्ट्रवादी काँग्रेस - 11
भाजप - 15
शिवसेना - 01
अपक्ष - 01

विधानसभेच्या निकालानंतर भाजपला राज्यात उतरती कळा लागली आहे. ज्या नागपुरात भाजप 2012 पासून जिल्हा परिषदेवर सत्तेत राहिली, त्याच नागपुरात आज भाजपला अवघ्या 12 जागांवर यश मिळालं आहे. आधीच जालना, बीड, औरंगाबाद, अमरावतीतून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला महाविकासआघाडीनं पराभवाची धूळ चारली होती. भाजपचे गड राहिलेल्या जालना, बीडमध्ये माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच होमपिचवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

Vijay Vadettiwar Bunglow | कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी, बंगल्याची दारं-खिडक्या बंद | ABP Majha



विधानसभेनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक केली. परिणामी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची धूळदाण उडाली आहे. महाविकासआघाडीला मिळणारं यश भाजपसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यामुळे आता महापालिकेचं भलंमोठं आव्हान पेलण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवला आहे. त्यामुळे नागपुरातील भाजपच्या घसरगुंडीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे.

संबंधित बातम्या : 

Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी

Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता

Palghar ZP Result | पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भाजपला मोठा दणका