एक्स्प्लोर

ना झटापट, ना लुटीचे निशाण, पवनकर कुटुंबाच्या हत्येचं गूढ

प्रॉपर्टी डीलिंगचे छोटे व्यवसाय करणारे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ता असलेल्या कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणी संपवले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

नागपूर: नागपुरात दिघोरी परिसरातील अराधनानगरमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांची धारदार आणि वजनदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपुरात एकच खळबळ उडाली. प्रॉपर्टी डीलिंगचे छोटे व्यवसाय करणारे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ता असलेल्या कमलाकर पवनकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणी संपवले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या हत्याकांडामागे कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद असण्याची शक्यता आहे. दरम्यान काल रात्री पवनकर यांच्या घरी त्यांचा मेहुणा मुक्कामी असल्यामुळे, पोलिसांचा संशय बळावला असून सध्या त्याचा शोध सुरु आहे. एक घर,पाच हत्या, एक संशयित आणि एक गूढ नागपूरच्या आराधनानगरातली आजची सकाळ थरकाप उडवणारी ठरली. कारण पवनकर कुटुंबातल्या घरात पडला होता मृतदेहांचा खच... आणि साचलं होतं रक्ताचं थारोळं.. या हत्याकांडामध्ये कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, आई मीराबाई पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर यांचा जीव गेला. पण दुसऱ्या खोलीत झोपलेल्या कमलाकर यांची मुलगी वैष्णवी आणि मेव्हण्याची मुलगी सुदैवाने वाचली. पण प्रश्न असा आहे की इतकं क्रूर हत्याकांड घडवलं तरी कुणी? मध्यरात्रीनंतर 1 ते 3 च्या दरम्यान पवनकर कुटुंबातील 5 सदस्यांची एकानंतर एक हत्या करण्यात आली. घरातल्या मुख्य बेडरुममध्ये एकाच डबलबेडवर कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना पवनकर, मुलगी वेदांती पवनकर आणि कमलाकरच्या मेहुण्याचा मुलगा कृष्णा पालटकर या चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर वृद्धा मीराबाई पवनकर यांचा मृतदेह किचनमध्ये जमिनीवर होता. कमलाकर पवनकर हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यामुळे यामागे राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा होती. कमलाकर हे प्रॉपर्टी डीलरही होते, त्यामुळे आर्थिक वादातून झाल्याचीही शक्यता वर्तवली गेली. पण पोलिसांना संशय मात्र वेगळाच आहे. काल रात्री पवनकर यांच्या घरी पाच मृत, दोन बचावलेल्या सात जणांव्यतिरिक्त आणखी एक माणूस होता. कमलाकर यांचा मेहुणा विवेक पालटकर. त्याची गाडी घराबाहेर आहे. पण विवेक बेपत्ता आहे. ना झटापटीचे निशाण, ना लुटीचा प्रयत्न. त्यामुळे हे कृत्य घरातल्याच माणसाने केलं असण्याची शक्यता दाट आहे.. आपल्याच पत्नीची हत्या करुन जेलमध्ये गेलेल्या विवेक पालटकरच्या दोन्ही मुलांची जबाबदारी कमलाकर यांनी घेतली होती. पण आज त्याच कमलाकर यांचं स्वतःच्या जीवासह अख्खं कुटुंब संपलं... मागे उरले... दोन कोवळे जीव. संबंधित बातम्या नागपुरात अख्ख्या कुटुंबाची हत्या, तीक्ष्ण हत्याराने पाच जणांचा खून  

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Embed widget