Teachers Constituency Elections Nagpur : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवाषिंक निवडणुकीसाठी शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. गेल्या पंधरवडयापासून या निवडणुकीसाठी उमेदवार व त्यांच्या समर्थक पक्ष व कार्यकर्त्यांनी सहाही जिल्हयात मतदारांशी वैयक्तीक संवाद साधत मतांचा जोगवा मागितला. उद्या, सोमवारी, 30 जानेवारीला या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर जिल्हयात या निवडणूकीसाठी 16 हजार 480 एवढी पात्र शिक्षक मतदार आहे.


यासाठी जिल्हयात एकूण 43 मतदान केंद्र आहे. या निवडणूकीसाठी आयोगाने प्रसिद्ध् केलेल्या निदेंशाप्रमाणे कोव्हीड-19 मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावयाचे आहेत. यंदा एकूण मतदारांमध्ये नव्या मतदारांची संख्या अधिक असल्याने नवीन मतदार शिक्षक आमदार निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे दिसून येत आहे.


मतदानाचे दिवशी शिक्षक मतदारांनी मास्क घालून येणे आवश्यक आहे. रांगेत उभे असतांना 6 फुटाचे अंतर राखणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची सोय केलेली असून त्याचा वापर करण्यात यावा. ताप असल्यास, जाणवत असल्यास, कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यास अशा मतदारांनी मतदानाकरीता शेवटच्या तासाला म्हणजे 3 ते 4 या वेळेतच मतदान करावे, अशा सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने 29 डिसेंबरच्या पत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. या निवडणुकीसाठी मतदान 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत तर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 


खासगी शिक्षकांत उत्साह


सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती बंद आहे. गेल्या वषीं अनेक शिक्षक निवृत्तही झाले. त्यानंतरही मतदारांची संख्या वाढली आहे. यात खासगी शाळा (CBSE) चे शिक्षकांनी अधिकाधिक नोंदणी केली आहे. यात विदर्भ अनुदानीत आदिवासी आश्रमशाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, खासगी शाळा शिक्षक संघटना, विदर्भ दिव्यांग शाळा-कर्मशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच सीबीएसई शाळा संघ्टना कल्याण असोसिएशन(सिस्वा) यांचा समावेश आहे. यासंघटनेने या निवडणूकीसाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच मतदार वाढले. आता हेच वाढलेले मतदान 'गेम चेंजर' म्हणून भूमिका बजावू शकतात. उमेदवारांनीही याच नव्या मतदारांशी संपर्क वाढविला होता. खासगी संस्थाच्या साखळी असल्याने शिक्षकांची संख्या मोठी आहे. उमेदवारांना याचा लाभ होईल.


मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा


नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा देण्यात येणार आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.


ही बातमी देखील वाचा...


Amruta Fadnavis : आधीच गुन्हे दाखल, त्यात अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ; नगरसेविकेच्या पतीवर तडीपारीची कारवाई