नागपूर : नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा 91किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये त्याची शाळा बंद झाल्याने त्याने गांजा तस्करी सुरू केल्याचं पोलिसांना सांगितले आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. नागपूर पोलिसांना हैद्राबादहून नागपूरमार्गे दिल्लीला गांजाची मोठी खेप जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसानी वर्धा मार्गावर सापळा रचून DL-4c-AD-3665 या क्रमांकाच्या गाडीला थांबवून झडती घेतली. या गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा सापडला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 13 लाख रुपये किंमतीचा 91 किलोचा गांजा जप्त केला आहे.
आता या प्रकरणाचा नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या मागे काही रॅकेट आहे का याचाही तपास करण्यात येतोय.
संबंधित बातम्या :
- Maharashtra Corona | राज्यात आज दिवसभरात 16 हजार 620 कोरोना बाधितांची नोंद, तर 50 रुग्णांचा मृत्यू
- ठाण्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची आत्महत्या, नागपूरच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
- मुंबईच्या विक्रोळीत 1800 किलो गांजा जप्त, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा