Orange News : विदर्भातील (Vidarbha) संत्री उत्पादक शेतकरी (Orange farmers) सध्या चिंतेत आहेत. कारण संत्र्यावर 'कोळशी' या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं संत्र्याच्या बागा संकटात सापडल्या आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात (Nagpur) जवळपास 30 ते 40 टक्के संत्र्याच्या बागा या कोळशीच्या प्रादुर्भावात अडकल्या आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 


कोळशीच्या प्रादुर्भावामुळं वर्षानुवर्षे जोपासलेल्या संत्र्याच्या बागाही पुढील वर्षांसाठी संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोळशी या काळ्या माशीपासून होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अल्प प्रमाणात होणाऱ्या कोळशीचा प्रादुर्भाव यावर्षी एवढा जास्त आहे की, वर्षानुवर्षे जोपासलेल्या संत्र्याच्या बागाही पुढील वर्षांसाठी संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.  संत्र्याच्या बागा कोळशीच्या प्रादुर्भावात अडकल्या असून संत्र्याची हजारो झाडं फळासह काळी पडत आहे.


संत्रा पिकावर पडणारा कोळशी रोग नेमका काय?


कोळशी हे काळ्या माशीपासून होणारे रोग 
काळी माशी संत्र्याच्या पानांचा रस शोषून घेते
संत्र्याच्या पानावर जगत माशी काळपट स्त्राव सोडते  
संत्र्याची पानं वरच्या भागातून काळ्या आवरणाखाली झाकली जातात
अखेरीस पानावरील काळ्या आवरणामुळं झाडांची प्रकाश संश्लेषण क्रियाच थांबते
त्यामुळं संत्र्याची झाडं सुकायला सुरुवात होते 


बागाच्या बागा काळपट, कृषी विभागाकडून अद्याप मार्गदर्शन नाही


गेल्या काही दिवसात विदर्भात खासकरून नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात कोळशी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळं बागाच्या बागा काळपट दिसू लागल्या आहेत. या काळपट बागातील संत्री घ्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील छोटे संत्रा व्यापारी संकटात सापडले आहे. कृषी विभाग मात्र अद्यापही निष्क्रिय असून, कुठेही शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होत नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.


संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट


नागपूर  आणि अमरावती हे दोन जिल्हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, येथील संत्री उत्पादक शेतकरी  सध्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तर दुसरीकडं या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर छोट्या आकाराची संत्री फेकून देण्याची वेळ आली आहे. बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क (Import duty) वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊनही त्याचा पुरवठा कमालीचा घटला आहे. चांगल्या मात्र आकाराने छोट्या संत्र्यांना कोणीच खरेदीदार नसल्यानं शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Orange News : वाशी मार्केटमध्ये संत्र्याची आवक वाढली, नागपूरच्या संत्र्याला ग्राहकांची पसंती