नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मद च्या दहशतवाद्याने त्या परिसरातील काही फोटो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्या ला पाठवले. मात्र ते फोटो फार लांबून घेण्यात आले होते, तसेच ते स्पष्ट नव्हते अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे


या कथित दहशतवाद्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयापर्यंत जाण्याचे ही प्रयत्न होते. मात्र, त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याचा बेत फसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. या दहशतवादाचे नाव जरी पोलिसांनी स्पष्ट केले नसले तरी त्याच्या विरोधात नागपुरात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून केंद्रीय तपास यंत्रणा आणि नागपूर पोलीस मिळून तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.


आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे या दहशतवाद्याला नागपुरात कोणीही मदत केली नव्हती असा दावा ही आयुक्तांनी केला आहे  दरम्यान, भविष्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याचा ताबा नागपूर पोलीस घेईल अशी माहितीही आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.


दरम्यान यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश ए मोहम्मद कडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे... याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या  बातम्या