ST strike : पोटाला कोणतीही जात, धर्म नसतो, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन एसटी कामगारांच्या कृती समितीने केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी संघटनांच्या कृती समितीशी बैठक झाली. त्यानंतर कृती समितीच्या विविध सदस्यांनी आपली भूमिका मांडली. आजच्या या बैठकीत आमच्या शंकांचे निरसण झाले आहे. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना निवडणं ही आमची चूक होती, असे देखील कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले.


आमची आज सविस्तर चर्चा झाली आहे. याआधी काही सुविधा देण्यात आल्या आहेत. एवढं सगळं दिलं मग आम्ही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी देखील केली आहे. यावरही चर्चा होईल असे सांगण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जी  पगारवाढ दिली आहे. त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या सर्व त्रुटी दूर करण्याचे सरकारने मान्य केले आहे. तसेच विलीणीकरणाबाबतचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत समिती नेमली आहे, तो समिती जो निर्णय देऊल तो सरकारला मान्य असेल असेही यावेळी समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे. तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामावर रुजू झाल्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देखील मंत्र्यांनी दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.


एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली. त्यावरही चर्चा करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. संप सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे आणि महामंडळाचे नुकसान होत आहे. तसेच सामान्य नागरिकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे कामगारांनी कामावर रुजू व्हावे, आपल्या नोकऱ्या वाचवाव्यात असे आवाहन कृती समितीच्या सदस्यांनी यावेळी केले. दरम्यान, विलिनीकरणाचा मुद्याबाबतची लढाई न्यायालयात सुरू आहे. ही न्यायालयीन लढाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले. 


एसटी कर्मचारी हे सामान्य कुटुंबातील आहेत. सध्या त्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. अशातच अॅड गुणरत्न सदावर्ते हे कागरांना भडकिण्याचे काम करत असल्याचा आरोपही यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. 2 महिन्याहून अधिक काळ झाले संप सुरू आहे, आता हा संप मिटला पाहिजे अशीच सर्वांची भूमिका आहे. कारण कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.