Nagpur News नागपूर : नागपूरातील अंबाझरी ओव्हर फ्लो (Ambazari Lake) पॉईंट जवळच्या दुरुस्ती कामाची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहणी केली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणातून अंबाझरी तलावाचा पाणी नागपूर शहरात शिरले होते आणि त्यामुळे नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून अंबाझरी तलावाचे मजबुतीकरण करण्यात यावे, तसेच अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंट जवळ पाण्याचा मोठा प्रवाह सामावून घेण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत होती.
त्यानंतर राज्य सरकारचे जल संसाधन विभाग, नागपूर महानगरपालिका आणि इतर विभागांनी समन्वयातून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्याचीच पाहणी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. यावेळी बोलताना अंबाझरी तलावाच्या काठावर असलेला स्वामी विवेकानंदांचे स्मारक हटवण्या संदर्भातही महत्वाचे भाष्य केले आहे.
सांडवा मजबुतीकररणाच्या कामाला वेग
नागपुराच्या (Nagpur) अंबाझरी तलावातील पाण्यामुळे शहरात कधी नव्हे तो मोठा पुर आला होता. त्या अनुषंगाने आम्ही विविध विभागांचा समन्वय घडवून आणला होता आणि पुराची कारणे काय आहेत, कुठे प्रवाहात अडथळे याचा विचार करण्यात आला होता. यात दीर्घकालीन आणि त्वरित करावयाची अशी दोन प्रकारची कामे हाती घेतली आहे. काही दीर्घकालीन कामामध्ये सांडवा मजबुतीकरण केला जात आहे. तो आगामी पंधरा दिवसात पूर्ण होईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाण्याची पातळी मेंटेन करण्यासाठी योग्य ते उपाय केले आहेत. त्यासाठी सांडव्याच्या भिंतीमध्ये तीन दार लावले जातील. तोवर पाणी निघण्यासाठी वेगळा मार्ग देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
मागील वर्षी आलेल्या पुराच्या वेळेला दोन अडथळे प्रमुख होते. त्यामध्ये रस्त्यावरील पुलाची उंची कमी होती, ती उंची वाढवली जात आहे. येत्या दहा जूनपर्यंत त्यातील काही काम पूर्ण होईल. तसेच समोरच्या वस्त्यांमध्ये स्केटिंग रिंग आणि पार्किंगमुळे काही ठिकाणी प्रवाहात अडथळे आले होते, तेही काढले जाणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अंबाझरी तलावाच्या काठावर असलेला स्वामी विवेकानंदांचे स्मारक हटवण्या संदर्भात तज्ञांची समिती स्थापन केली आहे. ती समिती जे निर्णय घेईल त्याप्रमाणे अंतिम निर्णय केला जाईल. तज्ञांची समिती जे जे सुचवेल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर प्रशासन सज्ज
नागपुराच्या (Nagpur) अंबाझरी तलावातील पाण्यामुळे शहरात कधी नव्हे तो मोठा पुर आला होता. उच्च न्यायालयाने 21 मार्च 2018 रोजी अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश देत एक जनहित याचिका निकाली काढली होती. या प्रकरणी (Nagpur Flood) शासनाने उदासीन, असंवेदनशील भूमिका घेतली असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने ठेवला होता. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावले होते.
त्यामध्ये धरण सुरक्षा संघटनेने अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी योजना तयार करावी, त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच निधीची कमतरता आहे म्हणून योजनेतील कामे थांबविता येणार नाही. या सोबतच या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांची राहील, असे आदेश बजावले होते. न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. परिणामी, पावसाळ्याच्या अनुषंगाने आता युद्धस्तरावर या निर्वाधीन कामाला वेग आले आहे. त्याचीच पाहणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या